[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गाझियाबाद : भारतीय वायू दलाला (Indian Air Force) आज ‘नवा योद्धा’ मिळाला आहे. भारतीय वायू दलात सी-295 एअरक्राफ्ट (C295 Transport Aircraft) सामील झाला आहे. चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) सारख्या शत्रूंना धडकी भरवण्यासाठी C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट म्हणजेच सी-295 वाहतूक विमान (C-295 MW Transport Aircraft) अधिकृतपणे भारतीय वायू दलात दाखल झालं आहे. आज भारत ड्रोन शक्ती 2023 कार्यक्रमात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. सी-295 मुळे भारतीय वायू दलाची ताकद आणखी वाढली आहे.
भारतीय वायूदलाचा ‘नवा योद्धा’
भारतीय वायू दलात 50 हून सी-295 विमाने सामील होणार आहेत. आज C-295 एअरक्राफ्ट भारतीय वायू दलाची ताकद वाढवण्यासाठी अधिकृतरित्या भाग बनला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंद यांनी गाझियाबाद येथील हिंजन एअरबेसवर एका कार्यक्रमात हे विमान अधिकृतरित्या वायू दलाकडे सोपवलं आहे. 2026 पर्यंत एकूण 56 C-295 विमाने वायू दलात दाखल होतील. यांचा खर्च सुमारे 21,935 कोटी रुपये आहे.
सी-295 विमान भारतीय वायू दलात दाखल
C-295 औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (Indian Air Force) सामील झालं. टाटा (TATA) आणि एयरबस (Airbus) डिफेन्स कंपनी या दोन कंपन्यांनी मिळून हे विमान बनवलं आहे. स्पेनमधून 6 हजार 854 किलोमीटरचे अंतर कापून हे विमान 20 सप्टेंबरला वडोदरा येथे पोहोचले. आज हे विमान वडोदराहून टेकऑफ झाल्यानंतर आणि हिंडन एअरबेसवर पोहोचलं. या विमानाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे विमान एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील धावपट्टीवरून टेक ऑफ करू शकते आणि याच्या लँडिंगसाठी फक्त 420 मीटर धावपट्टीची गरज आहे. यामुळे दुर्गम डोंगराळ भागात आणि बेटांवर थेट सैन्य उतरणं शक्य होणार आहे.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh formally inducts C-295 MW transport aircraft into the Indian Air Force at Hindon Airbase in Ghaziabad pic.twitter.com/hiIdEipFxY
— ANI (@ANI) September 25, 2023
C-295 विमानाची खासियत
- 480 किलोमीटर प्रतितास वेगाने 11 तास उड्डाण करण्याची क्षमता
- दुर्गम भागात लँडींग आणि टेक ऑफसाठी उत्तम
- डोंगराळ भागात सैन्य पोहोचवण्यासाठी तसेच जखमी किंवा गरजूंना स्थलांतरित करण्यासाठी फायदेशीर
- सैनिकांना सामान पोहोचवण्यासाठी उपयुक्त
- आपत्तीच्या काळात मदतीसाठी तसेच समुद्री भागात गस्तीसाठी
- C-295 विमाने समाविष्ट केल्यानंतर, Avro-748 विमाने टप्प्याटप्प्याने हवाई दलातून बाहेर जातील.
- 70 च्या दशकातील Avro-748 विमान बदलून अत्याधुनिक C-295 विमानामुळे भारताची संरक्षण व्यवस्था आणखी बळकट होईल.
महत्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]