Asian Games 2023 Indian Hockey Team Beat Singapore By 16 1 In Pool Match See Highlights

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Hockey Team Beat Singapore : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सोमावारी भारतीय महिला क्रिकेट संघाने गोल्ड पदकावर नाव कोरले होते. मंगळवारी, आज भारतीय हॉकी संघाने साखळी सामन्यात सिंगापूरचा दारुण पराभव केला. भारताने सिंगापूरचा १६-१ च्या फराकने पराभव केला. भारताने पहिल्या मिनिटांपासूनच सामन्यावर पकड मजबूत ठेवली होती.  भारताने पहल्या क्वार्टरमध्ये 1 गोल करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक गोल करत खेळाडूंनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.  कर्णधार हरमनप्रीत सिंहने 4 गोल केले. तर मनदीप सिंहने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली.

याआधीच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाचे निर्वादित वर्चस्व राहिले होते. भारतीय हॉकी संघाने उज्बेकिस्तानचा १६-० च्या फरकाने दारुण पराभव केला होता. आज सिंगापूरला आस्मान दाखवत भारताने बाजी मारली आहे. मनदीप सिंह याने 13व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल साधला. या गोलच्या बळावर पहिल्या क्वार्टरअखेर भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला 16व्या मिनिटाला ललित कुमारने भारतासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर २२ व्या मिनिटांला गुजरंत याने तिसरा आणि २३ व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने चौथा गोल केला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंह याने स्ट्राइक केले आणि भारताच्या खात्यात पाचवा गोल डागला. मनदीप सिंगने 29व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला. अशा प्रकारे भारताने पहिल्या हाफमध्ये 6-0 अशी आघाडी मिळवली.

दुसऱ्या हाफमध्ये गोलचा पाऊस – 

दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला खेळ आणखी उंचावला. दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर लगेच 37 व्या मिनिटाला मनदीप सिंह याने टीमसाठी सातवा गोल केला. त्यानंतर ३८ व्या मिनिटाला शमशेर सिंह याने आठा गोल केला. त्यानंतर 40व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल केले. आशा पद्धतीने भारताने दुसऱ्या हापची सुरुवात दणक्यात केली. भारताची आघाडी १०-० अशी झाली होती. 42व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत 11वा गोल केला अन् भारताची आघाडी ११-० अशी केली. मनदीप सिंहने 51व्या मिनिटाला दोन गोल केले तर अभिषेकनेही 51व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल डागले. यानंतर 53व्या मिनिटाला सिंगापूरच्या झकी जुल्करनैनने संघासाठी पहिला आणि शेवटचा गोल केला. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनंतर भारताच्या वरुण कुमारने 55 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत भारताला 16-1 ने आघाडीवर नेले.

[ad_2]

Related posts