The Rain Has Stopped At Narendra Modi Stadium Covers Are Coming Off The Umpires Are Out IPL 2022 Live

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2022 Live : अहमदाबादमध्ये पावसाची उघडझाप सुरु आहे. अर्धा तास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा धो धो कोसळण्यास सुरुवात केली आहे. मैदान सुखवणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यामुळे धावाधाव झाली. मैदानावरील कव्हर्स पुन्हा एकदा आले आहेत. खेळाडू अन् पंच पुन्हा एकदा डगआऊटमध्ये परतले आहेत. स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचे हाल होत आहेत. 

तीन तास धो धो कोसळल्यानंतर अखेर अहमदाबादमध्ये पावसाने विश्रांती घेतली. खेळपट्टी आणि मैदान सुखवण्याच काम सुरु झाले. निरीक्षण करण्यासाठी पंच मैदानावर परतले… क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळू लागला. 

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सर्व खेळाडू डगआऊटच्या बाहेर आले होते. पण पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आतमध्ये जावं लागले.  9.35 पर्यंत सामन्याला सुरुवात झाली तर सामना 20-20 षटकाचा होईल. तेथून पुढे सामना सुरु होणार असेल तर षटके घटवण्यात येतील. सध्याची स्तिती पाहा सामना 20-20 षटकांचा होण्याची शक्यता नाही. रात्री 11.56 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली जाईल. 11.56 ला सामना सुरु झाला तर कमीतकमी पाच षटकांचा सामना होणार आहे. 

CSK Vs GT Final overs per side on timing:

9.45pm – 19 षटकांचा सामना होईल.
10.30pm – 15 षटकांचा सामना होईल.
11pm – 12 षटकांचा सामना होईल.
11.30pm – 9 षटकांचा सामना होईल.

आजची रात्र आयपीएल फायनलची?
अहमदाबादच्या पावसाचा आयपीएल फायनलला तडाखा बसलाय. फायनल सुरु होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसानं आजच्या दिवसावर पाणी फेरलं तर फायनलसाठी उद्याचा दिवस राखीव आहे. रात्री ९.३५ वाजेपर्यंत खेळ सुरु झाला तर फायनल २०-२० षटकांची होणार आहे. रात्री ९.३५ वाजल्यानंतर खेळ सुरु झाला तर फायनलची षटकं कमी होणार आहेत. रात्री ११.५६ वाजता खेळ सुरु झाला तर फायनल पाच-पाच षटकांची होणार आहे. आज खेळ सुरु झाल्यावर पुन्हा पाऊस आल्यास उर्वरित सामना राखीव दिवशी होईल. त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल. 



[ad_2]

Related posts