Central railway to install cctv cameras with face recognition technology across 364 stations

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारांचा (Crime) शोध घेण्यासाठी आता मध्य रेल्वेनं मोठं पाऊल उचललं आहे. मध्य रेल्वेच्या 117 स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले 3652 कॅमेरे (CCTV Camera) बसवण्यात येणार आहेत.

तर 364 स्थानकांवर (Railway Station) व्हिडिओद्वारे पाळत ठेवणारे 6122 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. फेस रेकग्निशन सिस्टीम असलेले कॅमेरे प्रवाशांची सुरक्षा सुधारतील, गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवतील, कायद्याचे उल्लंघन करणार्यां ना प्रतिबंधित करतील आणि रेल्वे नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वे रेलटेलच्या (RailTel) मदतीने A1, A, B आणि C श्रेणीच्या स्थानकांवर निर्भया फंडातून 3652 सीसीटीव्ही कॅमेरे असलेली व्हिडिओ देखरेख प्रणाली बसवणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार यापूर्वीच रेल्वे बोर्ड आणि रेलटेल यांच्यात झाला आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा ओळखण्याची यंत्रणा, व्हिडीओ अॅनालिटिक्स, व्हिडिओ मॅनेजमेंट सिस्टीम असेल आणि मध्य रेल्वेच्या 117 स्थानकांवर तो बसवला जाईल. याशिवाय मध्य रेल्वेच्या 247 स्थानकांवर 2470 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मुंबई उपनगरीय नेटवर्कमधील सर्व स्थानकांसह मध्य रेल्वे स्थानकांवर लवकरच चेहरा ओळखणारी प्रणाली असलेले कॅमेरे सुसज्ज केले जातील. हे तंत्रज्ञान फरार गुन्हेगारांना पकडण्यात मदत करेल.

मध्य रेल्वेने 117 स्थानकांवर फेस रेकग्निशन सिस्टीम असलेले कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे, त्या सर्वांमध्ये 4K तंत्रज्ञान असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण यांसारखी एकात्मिक सुरक्षा प्रणालीने सुसज्ज असलेली स्थानके वगळता मुंबई विभागातील सर्व स्थानकांवर हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत.


हेही वाचा

[ad_2]

Related posts