Afghanistan Pacer Naveen-ul-Haq Retirement From ODI After ICC ODI World Cup 2023 Virat Vs Naveen Fight

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Naveen-Ul-Haq in Afghanistan World Cup 2023 : आफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकने (Naveen-ul-Haq) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकपनंतर नवीन निवृत्त होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन उल हक याने निवृत्तीबाबात माहिती दिली आहे. नवीनचे दोन वर्षानंतर आफगाणिस्तानच्या वनडे संघात पुनरागमन झालं होते. नवीनच्या निर्णायानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील आयपीएल दरम्यानचा वाद सर्वश्रुत आहे. 

देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. विश्वचषकानंतर एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेत आहे.  माझ्या देशासाठी टी-20 क्रिकेटमध्ये खेळत राहीन. निवत्तीचा हा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझी खेळण्याची कारकीर्द लांबवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला. आफगाणिस्तान क्रिकेटचे मनापासून आभार… अशी पोस्ट नवीनने इन्स्टाग्रामवर केली आहे.


नवीन-उल-हकचं 2021 नंतर संघात पुनरागमन
अजमतुल्ला उमरझाई दुखापतीनंतर पुनरागमन अफगाणिस्तानच्या संघात करत आहे, तो दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर होता. 2021 मध्ये शेवटचा वनडे खेळणारा नवीन देखील संघात परतला आहे. नवीननं आतापर्यंत फक्त सात एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 25.42 च्या सरासरीनं 14 बळी घेतले आहेत. 

विराट-नवीन वाद –
1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला होता. याच सामन्यात लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भर मैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वादही झाला होता. आता नवीनच्या पुनरागमनानं 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यानं पुन्हा एकदा उत्साहाला उधाण आलं आहे. 

अफगानिस्तान वर्ल्ड कप 2023 स्क्वॉड
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब-उर-रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक. 

रिझर्व्ह खेळाडू : गुलबदीन नईब, शराफुद्दीन अशरफ और फरीद अहमद मलिक



[ad_2]

Related posts