India V/S Australia Match : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>राजकोटमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ६६ धावांनी पराभव झालाय. तर तीन वनडे सामन्यांची मालिका भारताने २-१ ने जिंकली आहे. विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे पाहिलं जात होतं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ८४ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावा केल्या.भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी केली. तर मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार देण्यात आला. तर तिसऱ्या वनडेत भारताच्या ४ विकेट्स घेणाऱ्या ग्ले मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.</p>

[ad_2]

Related posts