Venus will enter Swarashi soon The confidence of this zodiac will increase along with financial gains

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Venus Planet Gochar In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. असंच नुकताच धन आणि समृद्धी देणारा शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक धनलाभ होणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12:43 वाजता सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 3 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहेत. यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र सिंह राशीत असल्यामुळे अनेक राशींना त्यांच्या पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीत वाढ होणार आहे. शुक्राच्या राशी बदलाचा कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया.

तूळ रास (Tula Zodiac)

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शुक्र ग्रह हा तूळ राशीचा स्वामी आहे. यावेळी तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात मधुरता वाढणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत दिसून येतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना त्यांच्या सध्याच्या नोकरीत त्यांच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळणार आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

सिंह राशीतील शुक्राचा प्रवेश कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुमचं नशीब चमकू शकतं. ज्या कामांसाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत होता ती कामे पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. अध्यात्माकडे तुमची आवड वाढेल. पूर्वी केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या काळात तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होऊ शकतात.

कर्क रास (Cancer Zodiac)

शुक्राच्या राशीत बदलाने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी काही ना काही मार्ग खुले होऊ शकतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts