[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : मंडईतील लोकमान्य टिळकांच्या चौकापासून सकाळी (Pune Ganeshotsav 2023) साडे दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मात्र अजूनही मानाचे गणपती वेगाने मार्गस्थ होत नसल्याचं चित्र आहे. दुपारी 1 वाजता मानाचा पाचवा केसरीवाडा पोहचत आहे. तर मानाचा तिसरा गुरुजी तालीम बेलबाग चौकात आहे. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडई चौकातून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ झाला. मानाचा पहिला कसबा आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी हे लक्ष्मी रोडवर आहेत. मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा हा वेग पाहता, यंदा लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविण्याचा मानस पूर्ण होईल का? याबाबत शंका आहे. त्यामुळे मंडळांनी आणि पोलिसांनीदेखील वेळेचं पालन करण्याची गरज आहे.
मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात…
1 – कसबा गणपती – 10:30 वाजता
2 – तांबडी जोगेश्वरी – 11 वाजता
3 – गुरुजी तालीम – 12 वाजता
4 – तुळशीबाग – 1 वाजता
गणेशोत्सवाचं संपूर्ण नियोजन करण्यासाठी हजारो पोलीस पुण्यातील रस्त्यांवर आहे. त्यामुळे तेदेखील या जल्लोषात सहभागी झाल्याचं दिसत आहे. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत थिरकण्याचा आनंद नक्कीच घ्यावा, पण विसर्जन मिरवणूकीतील मंडळांना वेळेत पुढं मार्गस्थ करण्याची जबाबदारी ते घेतायेत का? मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा वेग पाहता, पोलिसांच्या भूमिकेवर हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे. पुण्यात वैभवी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
4 वाजता दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला होणार सुरुवात
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणता गणपती कधी सहभागी होणार यावरुन वाद बघायला मिळाला. मात्र, दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्यावर ठाम आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो…
[ad_2]