Chhatrapati Sambhajinagar Bullock Cart Race Throw Stones In Two Groups Two Minors Injured

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरू असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. बैलगाडा शर्यतीवरून दोन गट आमने-सामने आले आणि यातूनच जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे यावेळी तुफान दगडफेक देखील करण्यात आली. याच दगडफेकीत रस्त्यावरून जाणारे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहे. जखमी मुलाला उपचारासाठी संभाजीनगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत वैजापूर तालुक्यासह इतर जिल्ह्यातून देखील लोकं आली होती. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी दोन गटात वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. पाहता-पाहता दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. याचवेळी या हाणामारीतून थेट दगडफेक सुरू झाली. अचानक दगडफेक सुरू झाल्याने उपस्थित नागरिकांनी तिथून पळ काढायला सुरुवात केली. त्यामुळे एकमेकांच्या मागे पळून दगडांचा मारा सुरू होता.

विशेष म्हणजे दगडफेक करणारे दोन्ही गट जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावर पोहोचले. याचवेळी विरगाव येथील काही लोकं समृद्धी महामार्गावरून पिकअपमधून प्रवास करत असताना दगड थेट त्यांच्या गाडीला जाऊन लागले. दरम्यान, याच गाडीतून प्रवास करणारे आयान एजाज सय्यद (वय 12 वर्षे, विरगाव,वैजापूर) आणि अरहींत त्रिभुवन (वय 6 वर्षे, वैजापूर) दोघेही जखमी झाले. आयान याच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच समोरची काच फुटून अरहींतच्या डोक्याला देखील दगड लागला आहे. 

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव…

अगरसायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान अचानक दोन गटात वाद झाला. यातूनच तुफान दगडफेक देखील झाली. वाद एवढा विकोपाला गेला की, दोन्ही गट एकमेकांच्या पाठीमागे धावून दगडफेक करत होते. जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावर पोहोचलेल्या या गटांकडून दिसेल त्या गाडीवर दगडफेक करण्यात येत होती. याचवेळी आयान आणि अरिहंत जात असलेल्या पिकअपवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यात दोघांच्याही डोक्याला दगड लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गाडी चालकाने तात्काळ दोन्ही मुलांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, आयानची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अजून पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

हिंदूंनी विसर्जनाचा तर मुस्लिमांनी मिरवणुकीचा दिवस बदलला; ‘दंगली’चा डाग लागलेल्या संभाजीनगरने दिला एकतेचा संदेश

[ad_2]

Related posts