[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्याच्या लोणावळ्यात नऊ वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण मावळ हादरले होते. चार दिवसांपूर्वी 25 सप्टेंबरला ही घटना घडली होती. घटनेतील फरार आरोपीचा लोणावळा पोलीस शोध घेत होती. मात्र आज दुपारी आरोपीने परंदवडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार मयत विजय शशिकांत मालपोटे, याच्यावर भा.द.वि कलम 376, 323, 506 पोक्सो कायदा कलम 4, 8, 12 नुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विजय मालपोटे याने नऊ वर्षीय बालिकेस चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने गुन्हा करून आपला जीवनप्रवास संपवला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ

पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. अत्याचार करुन मुलीला आई वडिलांना कोयत्यानं मारुन टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेच्या विरोधात उरळी कांचनमध्ये बंदची हाकही दिली होती. मुलीची आई मंगळवारी (11 जुलै) रात्री पावणे बाराच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला होता. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला होता.

नराधमांना शिक्षा कधी?

पुण्यात सध्या अल्पवयी मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.बाप, भाऊ यांच्याकडूनही बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्याने मुलींनी नेमकं कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच या नराधमांना शिक्षा कधी होणार?, असा प्रश्नही सातत्याने विचारला जात आहे.

हेही वाचा-

Pune Crime News : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट; लाठ्या काठ्या घेत दोन गट एकमेकांवर भर रस्त्यात भिडले, सहकार नगरमधील घटना

[ad_2]