Maratha Reservation All Maratha Community To Give Kunbi Certificate Demanded Dont Cheat Now Warning To Manoj Jarange Government

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : ज्या मराठा कुटुंबाकडे निजामकालीन पुरावे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत असे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिल्याचा दावा ओबीसी नेते आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. आता त्यांच्या याच दाव्यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमची मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी असून, आता बनवाबनवी करू नका असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 

दरम्यान,राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे ‘एबीपी माझा’शी बोलतांना म्हणाले की, “70 वर्षांपासून मराठा समाजाने समजूतदार पणाचीच भूमिका घेतलीय. आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठे हटणार नाहीत. सरसकट मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे, आरक्षण सरसकटच द्यावं लागेल. तसेच सरसकट द्यायचं नव्हतं तर सरकराने समिती कशासाठी स्थापन केली? वेळ कशासाठी घेतला?, एवढी बनवाबनवी समाजाशी होऊ शकत नाही आणि सरकार करणारही नाही. चार दिवस आरक्षण टिकणार नाही असे म्हणून, सरकारला बनवाबनवी करता येणार नाही. आता आमच्याकडून पर्याय नाही. सरकारने सरसकटचेच आश्वासन दिले होते. त्यामुळे आता बनवाबनवी करू नयेत,” असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 

सरकारने काढलेल्या जीआरनंतर आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता. चार दिवसांत हा प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटल्यानेच आम्ही त्यांना वेळ दिला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी हा वेळ दिला आहे. त्यामुळे 40 दिवस आम्ही त्यांना काहीही बोलणार नाही. सरकारला वेळ कशासाठी दिलाय त्याचं उत्तर सरकारनेच द्यायला हवेत. समाजाला एवढं वेड्यात काढू नका आणि डवचू नका, असेही जरांगे म्हणाले आहेत. 

पाच हजार पुराव्याच्या आधारे निर्णय घ्या…

एकीकडे जरांगे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत असतांना, प्रशासनाकडून 1 कोटी अभिलेख तपासल्यावर फक्त 5 हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तर यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “याच पाच हजार पुराव्याच्या आधारे महाराष्ट्र सरकार मराठ्यांना दोन तासात आरक्षण देवू शकतो. पुराव्यासाठी एक काय आणि पाच हजार काय. त्यामुळे सरकारला मराठयांना चाळीस दिवसांत आरक्षण द्यावेच लागेल. सरकारचा निकश आम्हाला मान्य नाही. मराठा कुणबी असल्याचा एक पुरावा मिळाला, त्यामुळे राहिलेल्या सर्व मराठ्यांना त्या आधारे आरक्षण द्यावेच लागेल. कुणबी मराठा आणि आमचा रोटी बेटी व्यवहार असल्याचे” जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange on Reservation : बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्यावंच लागेल

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी?; मराठवाड्यात 1 कोटी दस्तऐवजांमध्ये केवळ पाच हजार कुणबी नोंदी

[ad_2]

Related posts