World Cup Record Total Nine Teams With Pakistan Could Not Beat India Cricket Team In Odi World Cup Till Now

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team ODI World Cup Record : भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघ्या काही दिवसांत सुरुवात होत आहे. हा विश्वचषकाचा 13 वा हंगाम असेल. आतापर्यंत झालेल्या 12 वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात कधीही हरलेला नाही. आतापर्यंत विश्वचषकात दोन्ही संघाचा सातवेळा आमनासामना झाला, या सर्व सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. भारताविरोधात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ प्रत्येकवेळी ताकदीने मैदानात उतरतो, पण त्यात त्यांना यश मिळत नाही. भारताविरोधात विजय मिळवण्यात अपयशी ठरणारा पाकिस्तान एकमेव संघ नाही…इतर आठ संघानांही विश्वचषकात भारताविरोधात कधीही विजय मिळाला नाही.

पाकिस्तानशिवाय, केनिया, आयर्लंड, नेदरर्लंड, यूएई, नामेबिया, अफगानिस्तान, बरमूडा आणि ईस्ट अफ्रीका या नऊ संघांना भारताविरोधात अद्याप विश्वचषकात विजय मिळाला नाही.  भारत आणि केनिया यांच्यामध्ये विश्वचषात आतापर्यंत चार वेळा आमना सामना झालाय, या सर्व सामन्यात भारताने बाज मारली आहे. त्याशिवाय  आयर्लंड,  नेदरर्लंड या संघाचे प्रत्येकी दोन दोन सामने झाले आहेत. पण यात भारतानेच बाजी मारली. यूएई, नामेबिया, अफगानिस्तान, बरमूडा आणि ईस्ट अफ्रीका यांच्यासोबत झालेल्या एक एक सामन्यात भारताने विजय मिळला आहे. 

वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात विजय न मिळवू शकणारे संघ –

भारत विरुद्ध पाकिस्तान: 7 सामने- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध केन्या: 4 सामने- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध आयर्लंड : 2 सामने- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध नेदरर्लंड : 2 सामने- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध यूएई: 1 सामना- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध नामीबिया: 1 सामना- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध अफगानिस्ता: 1 सामना- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध बरमूडा: 1 सामना- सर्व सामन्यात भारताचा विजय
भारत विरुद्ध ईस्ट अफ्रीका: 1 सामना- सर्व सामन्यात भारताचा विजय.

 दरम्याव, विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. 4 मार्च 1992 रोजी दोन्ही संघामध्ये विश्वचषकात पहिली लढत झाली होती. तर 2019 मध्ये अखेरचा सामना झाला होता. आता यंदाच्या विश्वचषकात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये थरार होणार आहे. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार असून दहा संघ सहभागी होणार आहेत. 48 सामन्यानंतर क्रिकेटचा विश्वविजेता मिळेल.  5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. 
 

[ad_2]

Related posts