Chhatrapati Sambhajinagar Stolen Petrol From Woman And Use For Intoxication Crime News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : एखाद्या व्यक्तीला नशेची सवय पडल्यास, यासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. असाच काही विचत्र प्रकार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात समोर आला आहे. एका महिलेला चक्क पेट्रोल ने नशा करण्याची सवय लागली. पाहता पाहता ती या नशेच्या प्रचंड आहारी गेली. त्यामुळे परिसरातील दुचाकीतून पेट्रोल चोरून ती त्याचा वास घेऊन नशा करू लागली. मागील काही वर्षात हा प्रकार एवढा वाढला की, प्रत्येक अर्ध्या तासाला तिला नशेसाठी पेट्रोल लागू लागले. नशा करण्यासाठी जर तिला पेट्रोल मिळालं नाही, तर तिला अस्वस्थ वाटायचं. यातूनच अनेकदा ती परिसरात पेट्रोल चोरू लागली. पण, शेवटी हा प्रकार अधिकच वाढल्याने नागरिकांनी थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली. संबंधित महिलेला दामिनी पथकाने ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

अधिक माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्स परिसरातील एशिआड कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकलमधून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. घरासमोर उभ्या दुचाकीमधील पेट्रोल नळी कापून कुणीतरी अज्ञात व्यक्ती पेट्रोल चोरून नेत होता. त्यामुळे परिसरातील सर्वच नागरिक हैराण झाले होते. पेट्रोल चोरीच्या घटना अधिक वाढल्याने नागरिकांनी पाळत ठेवली. यावेळी 25 ते 26 वर्षाची एक महिला दुचाकीमधून पेट्रोल चोरी करत असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. सुरुवातीला नागरिकांनी तिला समजावून सांगितलं. मात्र, त्यानंतरही पेट्रोल चोरीचा प्रकार काही थांबला नाही. संबंधित महिलेला अनेकदा सांगूनही तिच्या सवयीमध्ये कोणताही फरक पडत नव्हता. विशेष म्हणजे गरीब घरातील ही महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल चोरून त्याचं काय करत असावी असा प्रश्न नागरिकांना पडला. त्यामुळे, याबाबत नागरिकांनी माहिती जाणून घेतली आणि त्यांना धक्काच बसला.

पोलिसांची घटनास्थळी धाव

अनेकदा समज देऊन देखील महिला पेट्रोल चोरत असल्याने नागरिकांनी तिच्यावर पाळत ठेवली. यावेळी चोरलेल्या पेट्रोलचा संबंधित महिला नशा करत असल्याचा पाहून परिसरातील नागरिकांना धक्काच बसला. पेट्रोलची नशा करणाऱ्या या महिलेला समजावण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला,पण ती नशेच्या एवढ्या आहारी गेली होती की, तिला प्रत्येक अर्ध्या तासाला नशेसाठी पेट्रोल लागत होता. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती दामिनी पथकाला दिली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अर्धा तासही नशा केल्याशिवाय राहू शकत नाही…

बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्स परिसरातील एशिआड कॉलनीमध्ये 50 ते 60 महिला पुरूष जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि दामनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला घरासमोर उभ्या दुचाकीतून पेट्रोल चोरत असल्याची नागरिकांनी तक्रार केली.  दामिनी पथकाने सदर महिलेची माहिती घेऊन तिचं घर गाठलं.  यावेळी ती आपल्या नवरा अन् दोन चिमुकल्या मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहत असल्याचे समोर आले. दामिनी पथकाने तिच्याकडे विचारणा केली असता, मी पेट्रोलची नशा करते असे तिने सांगितले. तसेच अर्धा तासही मी नशा केल्याशिवाय राहू शकत नाही असे ती म्हणाली. हे ऐकून पथकाला धक्काच बसला. लहानपणीच नशा करण्याची सवय लागल्याचं तिने सांगितले. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांकडे उपचारही केले, मात्र काहीच उपयोग झाला नाही, असे तिच्या पतीने सांगितले. शेवटी आता पोलिसांनी पुढाकार घेऊन सदर महिलेला मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे पाठविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Lightning : मराठवाड्यात विजांचे तांडव, पाच जण मृत्युमुखी; मृतांत मायलेकीचा समावेश

[ad_2]

Related posts