IPL 2023 Final CSK Vs GT A Look At Significant Numbers From All The Past 15 Finals

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Final, CSK vs GT:  आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण? धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे.. यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे..त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकरानं प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. पण आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या 15 फायनलमध्ये काय काय झाले.. सर्वोच्च धावसंख्या, निचांकी धावसंख्या, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी यासह अनेक विक्रम घडले आहेत. पाहूयात त्याबाबत एका क्लिकवर…

Highest team total: आयपीएल फायनलमधील सर्वोच्च धावसंख्या सनरायजर्स हैदराबाद संघाच्या (Sunrisers Hyderabad) नावावर आहे.  2016 फायनलमध्ये आरसीबीविरोधात हैदराबादने सात विकेटच्या मोबदल्यात 208 धावा चोपल्या होत्या. हैदराबादच्या संघाने चषक उंचावला होता.

Lowest team total : आयपीएलच्या फायनलमधील निचांकी धावसंख्या चेन्नईच्या नावावर आहे. 2013 मध्ये चेन्नईच्या संघाने मुंबईविरोधात नऊ विकेटच्या मोबदल्यात 125 धावा केल्या होत्या. या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.. मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा विजेता बनला होता. 

Most runs by a batter :  आयपीएलच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात आघाडीवर चेन्नईच्या सुरेश रैनाचे नाव आहे. सुरेश रैनाने आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. सुरेश रैना याने आठ आयपीएल फायनलमध्ये 36 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने 249 धावा काढल्या आहेत. यादरम्यान रैनाची सर्वोच्च धावसंख्या 73 इतकी राहिली आहे. तर सुरेश रैना याने आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत. 

Highest individual score by a batter : आयपीएल फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या शेन वॉटसनच्या नावावर आहे. शेन वॉटसन याने 2018 मध्ये हैदराबादविरोधात नाबाद 117 धावांची खेळी केली होती. 
 
Half-centuries : 2008 पासून आतापर्यंत आयपीएल फायनलमध्ये 26 अर्धशतके झाली आहेत.  

Centuries : आयपीएलच्या फायनलमध्ये आतापर्यंत फक्त दोन शतकांची नोंद आहे. 

Most wickets by a bowler : आयपीएल फायनलमध्ये डेवेन ब्रॉव्हो याने सर्वाधिक 10 विकेट घेतल्या आहेत. 

Best Individual figures : आयपीएल फायनलमध्ये सर्वात चांगल्या गोंलदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. 2009 मध्ये अनिल कुंबळे याने डेक्कन चार्सज विरोधात 16 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या होत्या.  

Most catches : सुरेश रैना याने सर्वाधिक सहा झेल घेतले आहेत. 

Most dismissals by a wicketkeeper : विकेटच्या मागे एमएस धोनीने फायनलमध्ये सात जणांना बाद केलेय.  

[ad_2]

Related posts