भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरु, शुटिंगमध्ये आणखी एक गोल्ड

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घौडदौड सुरुच आहे. शूटिंगमध्ये आज भारताने आणखी एक गोल्ड पदक जिंकले आहे. टीम इंडियाने शूटिंगच्या ट्रॅप पुरुष सांघिक कामगिरीमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. तर महिला संघाने रौप्य पदक पटाकवले.  भारताच्या एकूण पदकांची संख्या 41 वर पोहचली आहे. 

नेमबाजांनी डाव साधला –

भारतासाठी शूटिंगमधून सर्वाधिक पदके आली आहेत. नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगच्या विविध इव्हेंट्समधून भारताला आतापर्यंत 21 पदके मिळाली आहेत. यामध्ये सात गोल्ड, सहा रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आह. घोडेस्वारी, स्क्वॅश, महिला क्रिेट आणि टेनिस मिश्र…. या प्रकरात भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 41 पदकांचा समावेश आहे. यामध्ये 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.  

Asian Games Day 8 Live: अदिती अशोकने रचाला इतिहास
अदिती अशोक हिने रौप्य पदकावर नाव कोरत इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात महिला गोल्फरने भारतासाठी रौप्य पदक जिंकलेय.  अदितीकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण ती पदकापासून थोडक्यात वंचित राहिली.अदितीने भारतासाठी आठव्या दिवसातील पहिले पदक पटकावले. 



[ad_2]

Related posts