World Cup 2023 Top Bowler Jasprit Bumrah Shaheen Afridi Rashid Khan Trent Boult Mitchell Starc

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 Bumrah Rashid Wood : विश्व कप 2023 ची सुरुवात पाच ऑक्टोबरपासून होणार आहे. विश्वचषकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व दहा संघांनी आपल्या 15 जणांच्या चमूची घोषणा केली. त्यामुळे विश्वचषकातील प्रत्येक संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजीचे चित्र एकदम स्पष्ट झालेय. यंदाच्या विश्वचषकात पाच गोलंदाजाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पाच गोलंदाज धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये भारताच्या जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचा समावेस असेल.  

जसप्रीत बुमराह (भारत) –

दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवण्यासाठी सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाविरोधात नुकत्याच झालेल्या वनडे सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या. त्याआधी आशिया चषकात शानदार कामगिरी केली. बुमराह भारताच्या गोलंदाजीचे आक्रमण संभाळणार आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी बुमराहचा फॉर्म महत्वाचा आहे. बुमराहने वनडेमध्ये आतापर्यंत 129 विकेट घेतल्या आहेत.  

शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) आणि मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) –

जगातील सर्वात खतरनाक गोलंदाजामध्ये शाहीन आफ्रिदीचा समावेश आहे. यंदाही पाकिस्तानसाठी शाहीन महत्वाचा ठरणार आहे. त्याने आतापर्यंत 44 वनडे सामन्यात 86 विकेट घेतल्या आहेत. नसीमच्या अनुपस्थितीत शाहीन आफ्रिदीवर मोठी जबाबदारी असेल. 

मिचेल स्टार्क विश्वचषकात पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करण्यास तयार झालाय. सराव सामन्यात हॅट्ट्रिक घेत स्टार्कने प्रतिस्पर्धी फलंदाजांना इशाराच दिलाय. स्टार्क यंदाच्या विश्वचषकात विकेटचे अर्धशतक पूर्ण करेल. विश्वचषकात स्टार्कने आतापर्यंत 49 विकेट घेतल्या आहेत. 

ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) आणि मार्क वूड (इंग्लंड) –

न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि इंग्लंडचा मार्क वूड आपापल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. बोल्टकडे मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. बोल्टने वनडेमध्ये 197 विकेट घेतल्या आहेत. वनडे विश्वचषकात बोल्टने 39 विकेट घेतल्या आहेत. मार्क वूडही भेदक मारा करण्यासाठी आतुर असेल. मार्क वूडने 59 वनडे सामन्यात 71 विकेट घेतल्या आहेत.

राशिद खान (अफगानिस्तान) –

राशिद खान जादुई फिरकी गोलंदाजीमुळे प्रसिद्ध आहे. राशिदच्या अचूक टप्प्यासमोर दिग्गजही फेल जातात. राशिदने 94 वनडे सामन्यात 172 विकेट घेतल्या आहेत. राशिदच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील.

[ad_2]

Related posts