Maharashtra News Nashik News Historical Lake In Girane Village Neglected For Many Years Cleaned By Villagers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik News : नाशिक शहराजवळील गिरणारे (Girnare) येथील शिवकाळातील तळे भग्नावस्थेत असून तळ्यास नवसंजीवनी देण्याचे काम ग्रामस्थांकडून करण्यात आले. 16 शतकात परिसरातील खेड्यातील नागरिकांची तहान भागविणारे तळे (Ponds) मात्र आज पाण्यासाठी आसुसलेले दिसून आले. हीच तळमळ ग्रामस्थांनी हेरून तळ्याचा कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्याला मोठा इतिहास लाभला असून अनेक गडकिल्ल्यांचा (Maharashtra Fort) वारसा जिल्ह्याला लाभलेला आहे. मात्र सद्यस्थितीत या गडकिल्ल्यांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र आहे. याचबरोबर दगडी बारव, शिवकालीन मंदिरे (Temples), यासह इतिहासकालीन अनेक वास्तू आजही निदर्शनास येतात. मात्र आज सगळ्या वास्तू सध्या आपली व्यस्था मांडताना दिसून येत आहेत. अशीच एक वास्तू नाशिक शहराजवळील गिरणारे परिसरात भग्नावस्थेत होती. या वास्तूला गिरणारे ग्रामस्थांनी एकत्र येत नवं रूप दिले आहे. 

रयतेचा राजा असलेल्या शिवरायांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) आदर्श राज्यपद्धतीत गाव आणि नगरांसाठी अनेक मूलभूत गरजांचा अंतर्भाव होता. त्यात शेतकऱ्यांना बी बियाणे, तसेच सिंचनासाठी विहिरी, यासोबत गाव नगरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 16 व्या शतकात दगडी बांधणीचे तलाव साकारण्यात येत होते. गाव, नगरांना पिण्याचे पाणी मिळावे. येथील वन्यजीव, प्राणी, पक्षी, पाळीव प्राण्यांची तहान भागवणे हा त्यामागील उद्देश होता. याच पार्श्वभूमीवर गिरणारे गावच्या मागील बाजूस हे भलेमोठे तळे साकारल्याचे दिसून आले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गाळाचे साम्राज्य असल्याने काही थेंब पाणी साठत नाही. आजूबाजूची खुरटी झाडे वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे तळे दुर्लक्षित झाले होते. याच पार्श्वभूमीवर शिवकार्य गडकोट संस्था, आणि सिडको येथील कै. शांतारामबापू वावरे महाविद्यालय आणि गिरणारे ग्रामस्थांची संयुक्त श्रमदान मोहीमेद्वारे तळे स्वच्छ करण्यात आले. 

वर्षभर गावांना पाणी पुरवठा…. 

महाराष्ट्रात अशा शिवकालीन तलाव, तळे व विहिरींची बांधणीसाठी चुना व काळा पाषाणाच्या दगडाचा आधार घेतलेला दिसून येतो. त्यामुळं आजही ते सुस्थितीत असल्याचे दिसून येते. विशेषतः हे तळे तलाव किल्ल्यावरील असंख्य टाके, यातील खोली जास्तीत जास्त 10 किंवा 12 फूट असायची, तळाला मात्र जिवंत पाण्याचे पाझर आजही तळे, टाके, तलाव यातील गाळ काढतांना दिसून येतात. गिरणारेच्या शिवकालीन तळ्याला लागून जुनी विहीर ही ऐतिहासिक वारसा आहे. गिरणारे पूर्वीचे गिरी कंदरी असे नाव असलेल्या गावासह आजूबाजूच्या गावाना पिण्यासाठी पाणी मिळायचे. त्यासाठी ही बांधणी होती. विशेषता हे तळे आता सारखे आटत नसायचे, तळे व विहिरीत वर्षभर पाणी असायचे. 

[ad_2]

Related posts