रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांवर काळाचा घाला; गाढ झोपेत असताना ट्रॅकने दहा मजुरांना चिरडले, चार जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बुलढाणा:  बुलढाण्यातील (Buldhana Accident) राष्ट्रीय महामार्गावर  खामगाव – मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महामार्गाच्या बाजूला झोपलेल्यांना ट्रकने चिरडले आहे.  अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहे. रस्त्याच्याकडेला झोपलेले सर्व मजूर  होते. जखमी मजुरांवर मलकापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक चालकाचे  गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची  पोलिसांना शंका व्यक्त केली आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे.  हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून महामार्गावर कामासाठी आलेले होते. पहाटे साडे पाच वाजता हा अपघात झाला आहे.  अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.  घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.  या परिसरात पोलिसांनी आता मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीक वडनेर भोलजी या गावाजवळ मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं. हे सर्व मजूर महामार्गाच्या बाजूला झोपलेले होते. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाच रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात सहा मजूर हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून या सर्वांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व मजूर गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी साडेपाच वाजता हे सर्व मजूर झोपलेले असताना यांना भरधाव ट्रकने चिरडलं. तात्काळ स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या सर्वांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

 

[ad_2]

Related posts