IND Vs NEP Asian Games 2023 India Won The Toss And Elected To Bat Latest Marathi News Upadate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs NEP, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळविरोधात होत आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच भारतीय संघासाठी नेतृत्व करत आहे. ऋतुराजसह टीम इंडियाच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा असतील. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. महिला क्रिकेट संघाने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. आता पुरुष संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. युवा आर. साई किशोर याने भारतीय संघामध्ये पदार्पण केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या साई किशोरला टीम इंडियात पदार्पणाची संधी मिळाली आहे. 

नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या नऊ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. इतकेच काय तर टी20 मध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रमही नेपाळ संघाने केला आहे. पण आता नेपाळसमोर तगड्या टीम इंडियाचे मजबूत आव्हान असेल.

भारताची प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, आर साई किशोर, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह.

नेपाळची प्लेईंग 11

रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), संदीप जोरा, गुलसन झा, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहारा, संदीप लामिछाने.

कुठे होणार सामना
 
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत. सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील. ZJUT क्रिकेट स्टेडियम थरार पाहायला मिळणार आहे. 

एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार 

आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. सोनी लाइव्ह अॅपवर अथवा संकेतस्थळावर मोफत सामना पाहता येईल. 



[ad_2]

Related posts