3 Suspected ISI Terrorists Isis Conspiracy Against India Disclose Many Temples On Target Including Ayodhya Raam Mandir

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Police Action : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (Delhi Police Special Cell) “मोस्ट वॉन्टेड” (Most Wanted) दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम (Mohammed Shahnawaz Alam) आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित दहशतवादी पुणे आयसिस (ISIS) मॉड्यूलमधील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ पाळत ठेवल्यानंतर शोध मोहिम आणि देशभरात 200 हून अधिक ठिकाणी छापेनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे.

पुणे आयसिस मॉड्युलमधील तीन दहशतवादी अटकेत

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दहशतवादी शाहनवाजने पोलीस चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. पुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयएकडून प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. मोहम्मद शाहनवाज शफी उझिमा आलम, रिझवान अब्दुल, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी संशयित दहशवाद्यांची नावे आहेत.

ISIS चा मोठा कट उधळला

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार फरतुल्ला गौरी याच्या संपर्कात असून, हा संपूर्ण कट पाकिस्तान आणि आयएसआयकडून रचला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी ऑनलाइन आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कट्टरपंथी बनवतात आणि नंतर त्यांना दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पुण्यातील छापेमारीदरम्यान दहशतवाद्यांनी काढला पळ

एनआयएने आलमला “मोस्ट वॉन्टेड” घोषित करण्यात आलं होतं. या वर्षी जुलैमध्ये पुण्यातील छापेमारीदरम्यान आलमने पळ काढला होता. यानंतर त्याच्या अटकेसाठी एनआयए (NIA – National Investigation Agency) 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितलं की, आलम आणि त्याचे सहकारी – अर्शद वारसी आणि मोहम्मद रिजवान अश्रफ इंजिनीअर आहेत. हे तिघे जामिया मिलिया इस्लामियामधून पीएचडी करत आहेत.

 

 

[ad_2]

Related posts