Chennai Won Ipl 2023 By Defeating Gujarat Became Champion For Fifth Time Ravindra Jadeja Scored 10 Runs In Last Two Balls 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Final, GT vs CSK : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव केला आहे. रोमांचक सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर गुजरातवर विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नई संघाला 171 धावांचं आव्हान होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना अतिशय रोमांचक ठरला. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघात विजय मिळवून दिला.

जडेजाचा ‘विनिंग’ चौकार, अखेरच्या षटकापर्यंतचा रोमाच 

शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत तीन धावा झाल्या. यानंतर चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जडेजाने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर चेन्नईला विजयासाठी एका चेंडून चार धावांची गरज होती. यावेळी जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा पाचव्यांदा चॅम्पियन

चेन्नई सुपर किंग्सचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने अडीच तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 12.10 वाजता पुन्हा सामना सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचं लक्ष्य मिळालं. 

पावसामुळे अंतिम सामन्यात व्यत्यय

आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी होणार होता. पण, 28 मे रोजी अहमदाबादेत पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हा सामना सोमवारी खेळवण्यात आला. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. यानंतर चेन्नईच्या फलंदाजी वेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. यामुळे सामना मधेच थांबवण्यात आला. त्यानंतर पाऊस थांबल्यावर डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या चेंडूवर चेन्नईनं आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts