[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: साक्षी हत्याकांड प्रकरणी आता तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात साक्षीच्या शरीरावर चाकूने वारंवार वार केल्याचं समोर आलं आहे. तिच्या शरीरावर चाकूच्या १६ जखमा आढळून आल्या आहेत. एवढंच नाही तर डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचंही अहवालात समोर आलं असून तिचं डोकं फाटलं आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्येही आरोपी साहिल साक्षीला दगडासारख्या जड वस्तूने मारताना दिसत आहे.शवविच्छेदन अहवालामध्ये साक्षीच्या मानेवर चाकूच्या ६ आणि पोटावर १० जखमा आढळून आल्या आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की ते संपूर्ण शवविच्छेदन अहवालाची वाट पाहतील.
१६ वर्षीय साक्षी ही साहिलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रविवारी दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर साक्षी तिची मैत्रिण नीतूच्या मुलाच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असता साहिलने तिला रस्त्यात अडवले. याठिकाणी दोघांमध्ये काही वाद झाला, त्यानंतर साहिलने साक्षीवर चाकूने वार केले.

या घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी साहिल साक्षीवर चाकूने वार करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. साक्षी मृत झाली याची खात्री पटल्यानंतरच साहिलने तेथून पळ काढला.
साक्षीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथूनही अटक केली आहे.
दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नलवणे यांनी सांगितले की, आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. तो मेकॅनिक आहे आणि एसी आणि रेफ्रिजरेटर सुधरवण्याचं काम करतो. याप्रकरणी पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न राहणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
[ad_2]