Opposition Party Aggressive Over Nanded Government Hospital Issue Opposition Leaders On Visit To Nanded Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी सरकारला दोषी ठरवत काही गंभीर आरोप देखील केले आहेत. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज नांदेड दौऱ्यावर असून, शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी देखील करणार आहे. तसेच, 24 तासांत 24 रुग्णांचे मृत्यू कसे झाले याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देखील जाणून घेणार आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात देखील जाऊन पाहणी करणार आहे. तसेच, या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांकडून पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. 

अंबादास दानवे यांचा दौर! 

  • पहाटे 03.40  वाजता: नांदेड शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व मुक्काम.
  • सकाळी 07.00 वाजता: मोटारीने शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यायल, नांदेडकडे प्रयाण.
  • सकाळी 07.30  वाजता: शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यायल, नांदेड येथे आगमन व भेट.
  • सकाळी 09.00  वजता: पत्रकार परिषद (स्थळ: शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यायल, नांदेड.)
  • सकाळी 10.00  वाजता : मोटारीने हैद्राबाद विमानतळकडे प्रयाण.

 

[ad_2]

Related posts