क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. वनडे विश्वचषकाचा (World Cup 2023) उद्घाटन सोहळा रद्द (Opening Ceremony) करण्यात आला आहे. भारतात रंगणाऱ्या विश्वचषकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा सोहळा रद्द करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.

वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा रद्द

यापूर्वी, BCCI ने विश्वचषक सुरू अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium, Ahmedabad) वर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केल्याची बातमी  समोर आली होती. 4 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार होता. भारतरत्न माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते विश्वचषकाचं उद्घाटन पार पडणाक होतं. पण, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हा उदघाटन सोहळा आता रद्द करण्यात आला आहे.

क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा

सुत्रांच्या अहवालानुसार, वनडे विश्वचषक 2023 चा उद्घाटन सोहळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रद्द केला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ICC ODI क्रिकेट विश्वचषक 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार यांच्या उपस्थिती राहणार होते. मात्र, आता हा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींची विशेषत: भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप यासंबंधित अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.



[ad_2]

Related posts