Odi World Cup 2023 Five Batsman Who Watch Out For Top 5 Batsman Of Cricket Odi Icc World Cup 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC World Cup 2023 : वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023 ) ला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम (ICC ODI World Cup) यंदा भारतात होत आहे. यंदा विश्वचषकामध्ये 10 संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. सलामी सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्या रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, यंदा विश्वचषकामध्ये काही फलंदाजांकडे जगाच्या नजरा असणार आहेत.

1. Virat Kohli : विराट कोहली

भारताचा स्टार (Team India) क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ने 2023 च्या आशिया कपमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसणार आहे. 34 वर्षीय विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषकही असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. विराट विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. किंग कोहलीने 2011 मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

2. Rohit Sharma : रोहित शर्मा

गेल्या विश्वचषकातील ‘स्टार’ खेळाडू रोहित शर्मा यावेळीही शानदार फॉर्ममध्ये दिसेल. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 2019 विश्वचषकात रोहितने पाच शतकं झळकावून जगाला दमदार कामगिर दाखवून दिली होती. यंदाही रोहित शर्माच्या बॅटची झलक पाहायला मिळू शकते. रोहितने विश्वचषकापूर्वीच आक्रमक फलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

3. Babar Azam : बाबर आझम

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच्या सराव सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली शैली दाखवून दिली आहे. बाबर पहिल्यांदाच भारतात आला आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सर्वाच उत्सुक आहेत. बाबरचा दमदार फॉर्म पाहता विश्वचषकात तो सहज तीन ते चार शतके झळकावू शकतो, असंही सांगितलं जात आहे.

4. Ben Stokes : बेन स्टोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याच्या निवृत्तीवरून यू-टर्न घेतला आहे. स्टोक्स या विश्वचषकात इंग्लंडसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीही करण्याची शक्यता आहे. स्टोक्सला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली माहीती आहे आणि चांगला खूप अनुभवीही आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात बेन स्टोक्सच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

5. Steve Smith : स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. या विश्वचषकात स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये स्मिथ हा संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मात्र, यावेळी भारतामध्ये विश्वचषक खेळला जात असल्याने संघाला स्मिथची आणखी गरज आहे. स्मिथ भारतीय खेळपट्ट्यांवर सहज धावा करण्यात पटाईत आहे. तो वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूं समोरही सहज धावा काढतो. त्यामुळे यंदा विश्वचषकात स्मिथच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts