Nashik Latest News Seven Ministers Of NCP Have Guardian Ministership, But Minister Chhagan Bhujbal Has No Place Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांच्या  पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता. अखेर आज राज्य सरकारकडून 12 जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादीच्या (NCP) सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यात राष्ट्रवादीचे नेते भुजबळांचा कुठेही समावेश नसल्याने नेमकं घोड अडलं कुठं? असा सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये पाऊल टाकल्यानंतर राज्यभरातील पालकमंत्री पदाची गणिते बिघडली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री पद मिळत नव्हतं. शिंदे आणि फडवणीस (Shinde Fadnavis) सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे अनेक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्री वाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर आज राज्य सरकारकडून 12 जिल्ह्यांना स्वतंत्रपणे पालकमंत्री देण्यात आले आहेत. या 12 मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीचे सात मंत्री समाविष्ट असून, भुजबळ यांना मात्र डावलल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्यावेळी नाशिकच्या (Nashik) पालकमंत्री पदाचा विषय आला होता. त्यावेळी गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर होतं. मात्र ऐनवेळी दादा भुसे यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री बदलणार अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली होती. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नेत्यांवर देण्यात आली होती. त्यामुळे कार्यभार वाढत होता. अखेर आज राज्य सरकारकडून 12 जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे पालकमंत्री पदांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. या बारा जिल्ह्यात जवळपास राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळाला आहे. मात्र भुजबळ यांना कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

छगन भुजबळांचा रोष पत्करणे म्हणजे…. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केली. पण, या यादीत छगन भुजबळांना कोणतीच जबबादारी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात छगन भुजबळ हे जेष्ठ मंत्री असून ते ओबीसीचे नेते आहे. पण, आज जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत त्यांना वगळले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात यावे यासाठी चंद्रकात पाटील यांचा विरोध असतांनाही दादांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. पण, भुजबळांसाठी हा विरोध शिंदे-फडणवीस यांनी स्विकारला नसल्याचे दिसते आहे. सुधारीत यादीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 पालकमंत्रीपद वाट्याला आले. पण, त्यात भुजबळ नाही. पालकमंत्रीपदासाठी रायगड, सातारा व नाशिक येथे शिंदे गटाचा विरोध होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यात भुजबळांना हवे असलेले नाशिकही मिळाले नाही. या ठिकाणी शिंदे गटाचे दादा भुसे हेच आता पालकमंत्री राहणार आहे.

 

इतर महत्वाची बातमी : 

एका दादांचं डिमोशन, दुसऱ्या दादांचं प्रमोशन, पुण्यात चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पालकमंत्री, संपूर्ण 12 जिल्ह्यांची यादी

[ad_2]

Related posts