Indian Cricket Team Combination For World Cup 2023 Rohit Sharma Virat Kohli

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team Combination For World Cup 2023 : वनडे विश्वचषकासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहेत. अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून विश्वचषकाची सुरुवात करणार आहे. विश्वचषकातील टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल सध्या चर्चा सुरु आहे. भारतीय संघात 5 स्पेशालिस्ट फलंदाज, चार अष्टपैलू, दोन विकेटकिपर, तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज आहे. 

पाच प्रमुख फलंदाज कोणते ? 

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्याकडे आघाडीच्या फळीची जबाबदारी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुभव ही भारताची जमेची बाजू आहे. श्रेयस अय्यर मध्यक्रमसाठी निवडला आहे. त्याशिवाय पाचवा फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव याची निवड करण्यात आली आहे.

5 फलंदाज : रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव. 

विकेटकीपर म्हणून कुणाला पसंती – 

भारतीय संघात विकेटकीपर म्हणून दोन जणांची निवड करण्यात आली आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड झाली आहे. राहुल प्रथम विकेटकीपर म्हणून पसंती असेल. तर इशान किशन बॅकअप विकेटकीपर म्हणून असेल. 

विकेटकीपर: केएल राहुल आणि इशान किशन.

अष्टपैलू कोणते? 

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या याला अष्टपैलू म्हणून संघात सामील करण्यात आलेय. त्याशिवाय अनुभवी अष्टपैलू रविंद्र जाडेजा याच्यावरही मोठी जबाबदारी असेल.  गोलंदाजी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर याला स्थान दिलेय. अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यामुळे आर. अश्विन याची एन्ट्री झाली आहे. 

अष्टपैलू –  : हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, आर. अश्विन

फिरकीचा भार कुलदीपच्या खांद्यावर – 

भारतीय संघात फक्त एकच प्रमुख फिरकी गोलंदाजीची धुरा एकट्या कुलदीप यादवच्या खांद्यावर असेल. कुलदीपच्या जोडीला रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन आहेत. 
 
फिरकीपटू : कुलदीप यादव. 

वेगवान गोलंदाज –

विश्वचषकात भारताकडे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी आहे.  यांच्या जोडीला हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर असतील. 

वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज  

विश्व कप 2023 साठी भारतीय संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

[ad_2]

Related posts