Romanian Dictator Nikolai Chaushesku Used To Wash His Hands With Alcohol Several Times A Day People Lived In Fear

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Romanian Dictator: हिटलरपासून ते स्टॅलिनपर्यंत… जगात असे अनेक हुकूमशहा (Dictator) होऊन गेले, ज्यांचं नाव आजही घेतलं जातं. मुघलांच्या काळातही अनेक हुकूमशहा होऊन गेले, त्यांना पाहून लोक थरथर कापत असे. 60 च्या दशकात, रोमानियामध्ये असाच एक शासक होता, ज्याच्या काळात लोक दहशतीत राहत होते. निकोलस चाचेस्कू नावाच्या या हुकूमशहाला अशा अनेक विचित्र सवयी होत्या, ज्यांचा उल्लेख आजही केला जातो. यापैकी एक सवय म्हणजे, दिवसातून 20 वेळा दारुने (Alcohol) हात धुणे. आता तो नेमकं असं का करायचा? पाहूया…

दिवसातून वीस वेळा दारुने धुवायचे हात

हुकुमशहा निकोलस चाचेस्कू हे लोकांना स्पर्श केल्यानंतर त्यांचे हात स्वच्छ धुवायचे. जेव्हाही ते कोणाशी हात मिळवायचे अथवा शेकहँड करायचे, त्यावेळी नंतर लगेच ते त्यांचा हात अल्कोहोलने धुवायचे. समजा, जर त्यांनी दिवसाला 30 लोकांशी हात मिळवला, तर तितक्या वेळा ते बाथरुममध्ये जाऊन अल्कोहोलने हात धुवायचे. याच कारणामुळे त्यांच्या स्युटमधील प्रत्येक बाथरुममध्ये दारु ठेवली जायची.

निकोलस चाचेस्कू यांना स्वच्छतेचा एक प्रकारे आजारच होता. आजच्या काळात ज्या पद्धतीने लोक हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतात, त्याच प्रमाणे त्या काळातील निकोलस चाचेस्कू हे हुकुमशहा त्यांचे हात स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करायचे.

हुकुमशहाच्या काळात लोक दहशतीत

निकोलस चाचेस्कू हा एक क्रूर शासक होता, तो लोकांना त्याच्या मनात येईल ते आदेश देत असे, मग ते काहीही असो. चाचेस्कूने एकदा लोकांना त्यांच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवण्याचे आदेश दिले. तो सतत लोकांची हेरगिरी करून त्यांच्यावर लक्ष ठेवत असे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हुकुमशहाचे गुप्तचर एजंट लोकांवर लक्ष ठेवत नेहमी रस्त्यावर बसलेले असायचे.

खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळणंही झालं कठीण

चाचेस्कूनं 25 वर्षं देशातील माध्यमं पूर्णपणे निर्बंधांखाली ठेवली. एवढंच नाही तर त्यानं देशामध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू, तेल आणि पाण्याबरोबरच औषधांवरही निर्बंध लादले. बाजारात फळं, भाज्या मिळणं बंद झालं. या सर्वाचा परिणाम म्हणजे हजारो लोक विविध आजार आणि उपासमारीला बळी पडले. चाचेस्कू यांना रोमानियामधील लोक ‘कंडूकेडर’ म्हणून ओळखत होते, ज्याचा अर्थ ‘नेता’ असा होतो. तर त्यांच्या पत्नी एलिना यांना ‘राष्ट्रमाते’चा किताब देण्यात आला होता.

फोटोत उंच दिसलो पाहिजे, फोटोग्राफर्सना सूचना

निकोलस चाचेस्कू यांची उंची कमी होती. ते केवळ 5 फूट 4 इंचांचे होते. मात्र, त्यांनी सर्व फोटोग्राफरला सूचना दिल्या होत्या की, ते फोटोत उंच दिसले पाहिजे असेच फोटो काढावे. ते 70 वर्षांचे असतानाही त्यांचे वयाच्या 40 व्या वर्षांत काढलेले फोटो प्रकाशित होत होते. त्याच्या शेजारी सुंदर महिलेनं उभं राहून फोटो काढलेलं मात्र, त्यांची पत्नी एलिना यांना आवडत नव्हतं.

अन् शेवटी दुर्दैवी अंत

चाचेस्कूची दहशत इतकी वाढली होती की, रोमानियातील लोकांना व्यवस्थित खायलाही मिळत नव्हतं. फळं, भाज्या आणि मांस दुसऱ्या देशांत निर्यात केलं जात होतं. या सगळ्याला कंटाळून लोकांनी हुकूमशाही विरोधात आवाज उठवला आणि ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेवटी 25 डिसेंबर 1989 मध्ये चाचेस्कू आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. कोर्टाने त्या दोघांनाही मृत्यूदंडाची सिक्षा सुनावली आणि सैनिकांनी गोळी झाडून चाचेस्कूच्या हुकूमशाहीचा अंत केला.

हेही वाचा:

Brazil: अ‍ॅमेझॉन नदीतील 100 डॉल्फिनचा मृत्यू; हजारो अन्य मासेही मृत, नेमकं कारण काय?

[ad_2]

Related posts