[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सामन्यातील विजयी चौकार लगावल्यानंतर जडेजाला धोनीने थेट उचलून घेतलं. हा क्षण सर्वच चाहत्यांसाठी खूप मोलाचा होतो. विजयानंतर जडेजा म्हणाला, “माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर गुजरातमधील या सर्वांसमोर पाचवे जेतेपद जिंकून खूप आनंद झाला आहे. मी स्वतः गुजरातचा आहे आणि त्यामुळे हि एक विशेष भावना आहे. उशिरापर्यंत पाऊस होता आणि तरी ही गर्दी पाऊस थांबण्याची वाट बघून इथे कायम होती; ही गर्दी खरंच आश्चर्यकारक आहे. आम्हाला सपोर्ट करणाऱ्या सर्व CSK च्या चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. मी हा विजय चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खास सदस्य MS Dhoni ला समर्पित करतो आहे.”
सामन्यातील शेवटचे षटक सुरु होते तेव्हा तुझ्या मनात काय विचार होते, तू नेमका काय विचार करत होतास. यावर उत्तर देताना जडेजा म्हणाला, मी स्वतःला बॅक करत सरळ फटकेबाजी करू पाहत होती, उचलून मारण्याचा विचार माझ्या मनात होता. कारण मला माहित होतं मोहित स्लो बॉल टाकू शकतो.”
अशारितीने जडेजा मोहितच्या गोलंदाजीसाठी आधीच तयार होता आणि चेंडू येताच त्याने आपला प्लॅन आजमावत थेट चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवली आणि चेन्नईने शेवटच्या दोन चेंडूंवर विजय साकारला.
[ad_2]