Wrestlers Protest Sakshi Malik Says Movement Against Brij Bhushan Sharan Singh Will Continue

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sakshi Malik On Wrestlers Protest: कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers Protest) सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार साक्षी मलिकनं (Sakshi Malik) केला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. पण 28 मे रोजी दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या झटापटीनंतर आंदोलन मोडून काढण्यात आलं. कुस्तीपटूंनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर एफाआयआर दाखल करुन त्यांना सोडण्यात आलं. अशातच साक्षी मलिकनं सोमवारी (29 मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलं आहे. साक्षी मलिक म्हणाली की, “आम्ही मागे हटलेलो नाही.” 

रविवारी (28 मे) विनेश फोगट, बजरंग पुनिया, संगीता फोगट, साक्षी मलिक आणि इतर अनेकांना दिल्ली पोलिसांनी महिला महापंचायतीसाठी नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतलं होतं. यानंतर आंदोलकांचं सामान जंतरमंतरवरून हटवण्यात आलं.

कुस्तीपटूंना रविवारी ताब्यात घेतल्यानंतर काही वेळानं सोडून देण्यात आलं. आंदोलक कुस्तीपटूंना जंतरमंतरवरुन हटवल्यानंतर एका दिवसानं, दिल्ली पोलिसांनी सोमवारी (29 मे) कुस्तीपटूंना जंतरमंतर वगळता इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल, असं सांगितलं. 

व्हिडीओमध्ये साक्षी मलिकनं काय म्हटलंय? 

कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, “माझा सर्वांना नमस्कार, कारण आपणा सर्वांना माहित आहे की, 28 मे रोजी आम्ही शांततेनं मोर्चा काढला होता आणि पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं, अटक केली आणि आमच्यावर एफआयआर दाखल केला, आम्ही कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं किंवा कोणाचंही नुकसान केलेलं नाही. एका महिलेला 20-20 पोलीस रोखत होते. त्यांनी आमच्यावर किती अत्याचार केले, हे तुम्ही स्वतःच समजू शकता, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.” 

“हा व्हिडीओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे, आमचे समर्थक, जे अजूनही कुठे-कुठे थांबले आहेत. गुरुद्वारामध्ये आमची वाट पाहत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, पोलिसांनी सोडल्यानंतर संपूर्ण दिवस आम्ही आंदोलनाची रूपरेषा आखण्यात मग्न होतो. आम्ही मागे हटलो नाही, आंदोलन सुरूच राहील आणि जे काही होईल ते आम्ही लवकरच कळवू. तुम्ही असेच सपोर्ट करत रहा. धन्यवाद.”

28 मे रोजी जंतरमंतरवर घडलं काय? 

देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं लोकार्पण होत असतानाच दुसरीकडे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर भर रस्त्यात बळाचा वापर करुन त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं. कुस्तीपटूंवर केलेल्या बळाच्या वापरानं काँग्रेसकडून पीएम मोदींवर कडाडून हल्ला चढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानतंर नव्या संसदेसमोर झटापट झाली. बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेनं कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतलं. 

दिल्ली पोलिसांनी एवढ्यावर न थांबता जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले. विनेश आणि संगीता फोगट यांना दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसदेसमोर होत असलेल्या महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेनं कूच करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला. 

जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 

कुस्तीपटू गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.



[ad_2]

Related posts