Jonny Bairstow Hits The Second Ball Of The World Cup 2023 For Six

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 1st Six : अहमदाबादच्या मैदानात इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या सामन्याने विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार, हे जवळपास निश्चित होते. तरिही न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी घेतली. अपेक्षाप्रमाणे इंग्लंडने वादळी सुरुवात केली. इंग्लंडचा सलामी फलंदाज जॉनी बेयरस्टो याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारत विश्वचषकाची वादळी सुरुवात केली. बेयरस्टो याच्या रौद्ररुपानंतर सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली. यंदाच्या विश्वचषकात पहिला चौकार आणि षटकार मारण्याचा मान इंग्लंडच्या बेयरस्टो याला मिळाला आहे. 

आतापर्यंत झालेल्या 12 विश्वचषकात धावांची सुरुवात षटकाराने झालीच नाही. यंदाच्या विश्वचषकाची सुरुवातच षटकाराने झाली आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेयरस्टो याने  ट्रेंट बोल्ट याच्या दुसऱ्या चेंडूवर जोरदार षटकार मारला. बेयरस्टोची आक्रमक सुरुवात पाहून स्टेडिअममधील चाहते बुचकळ्यात पडले. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय…
 

दोन्ही संघाची अशी आहे प्लेईंग 11
World cup 2023 England vs New Zealand live updates :  इंग्लंड (अंतिम 11) : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (अंतिम 11) : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट



[ad_2]

Related posts