Maharashtra News Chhatrapati Sambhaji Nagar Transfer Of Officers In Chhatrapati Sambhaji Nagar Police Force

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलात (Chhatrapati Sambhaji Nagar Police Force) मोठा फेरबदल करण्यात आला आहे. नव्याने आलेल्या पोलीस आयुक्त मनोज लोहिया (Manoj Lohia) यांनी शहरातील अनेक ठाणेप्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. तर नव्याने आलेल्या काही पोलीस सहायक पोलीस आयुक्त यांच्या देखील नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदल्यांची मोठी चर्चा शहर पोलीस दलात पाहायला मिळत आहे. 

कोणाच्या कोठे बदल्या…

ठाणे प्रमुखांच्या बदल्या 














अ.क्र. पोलीस अधिकारी नावं  सध्याची नेमणूक  बदलीचे ठिकाण 
1 अविनाश आघाव  गुन्हे शाखा  वाळूज एमआयडीसी 
2 संदीप गुरमे  वाळूज एमआयडीसी  गुन्हे शाखा 
3 विठ्ठल पोटे  बेगमपुरा  सिटी चौक 
4 दिलीप गांगुर्डे  वाहतूक शाखा  बेगमपुरा 
5 गीता बागवडे  उस्मानपुरा  वाळूज पोलीस ठाणे 
6 अशोक गिरी  नियंत्रण कक्ष  उस्मानपुरा 
7 सचिन इंगोले  वाळूज  वाहतूक शाखा वाळूज 
8 गणेश ताठे (दुय्यम) वाळूज एमआयडीसी 
9 ब्रह्मा गिरी  वेदांतनगर 
10 परविणा यादव  साय्ब्द पोलीस ठाणे 

बदलून आलेल्या अधिकऱ्यांची नियुक्ती…









अ.क्र. पोलीस अधिकारी नावं  सध्याची नेमणूक  बदलीचे ठिकाण 
संपत सखाराम शिंदे  पोलीस अधीक्षक अहमदनगर  सहायक पोलीस आयुक्त शहर विभाग 
2 साईनाथ रामराव ठोंबरे  पोलीस अधीक्षक, मुंबई  सहायक पोलीस आयुक्त सिडको विभाग 
3 धनंजय हरिदास पाटील  उप विभागीय पोलीस  अधिकारी  सहायक पोलीस आयुक्त गुन्हे  विभाग 
4 रणजीत जगन्नाथ पाटील  उप विभागीय पोलीस अधिकारी  सहायक पोलीस आयुक्त उस्मानपुरा 
5 निशिकांत भुजबळ  सहायक पोलीस आयुक्त सिडको विभाग  सहायक पोलीस आयुक्त  विशेष शाखा 

अनेक दिवसांपासून बदल्यांची चर्चा… 

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मनोज लोहिया यांची बदली झाली. दरम्यान पोलीस आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यावर लोहिया यांनी पोलीस दलात अनेक बदल केले आहे. याचवेळी पोलीस दलात काही बदल्या होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. दरम्यान प्रत्यक्षात या बदल्यांचा बार फुटला असून, अनेक ठाणेप्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

बदला-बदली नव्हे अदलाबदली? 

शहर पोलीस दलात बदल्या होणार असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान अनेकांना या बदल्यानंतर धक्का बसेल अशीही चर्चा होती. मात्र असे न होता ‘तू माझ्या जागी मी तुझ्या जागी’ अशी अदलाबदल करण्यात आल्याची चर्चा पोलीस दलात आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या पोलीस आयुक्तांच्या काळात शहर पोलीस दलात दोन गट असल्याची जोरदार चर्चा होती. पण पोलीस आयुक्तांच्या बदल्याच्या आदेशानंतर यात बदल होईल अशी अपेक्षा असताना तसे झाले नसल्याची देखील चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ तातडीने 30 हत्यारबंद पोलिस पोहचणार; छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांची माहिती

[ad_2]

Related posts