[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सध्या हत्येचं सत्र सुरुच आहे. तर मागील सहा महिन्यांमधील भंडारा जिल्ह्यामधील ही चौथी घटना आहे. घराशेजारील लहान मुलांच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या प्रकरणातील आरोपील भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
घराशेजारी लहान मुलं खेळत असताना त्यांच्यामध्ये काहीसं भांडण झालं. लहान मुलांचं हे भांडण थेट कुटुंबापर्यंत पोहचलं. इतकचं नव्हे तर हाच वाद कुटुंबाच्या जीवावर देखील बेतला. एका लोखंडी रॉडनं या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये ज्या कुटुंबावर हा हल्ला करण्यात आला त्यामधील शालिकराम सहारे 65 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर पत्नी मिरा सहारे वय 60 आणि त्यांचा मुलगा किशोर सहारे वय 40 यांचा मृत्यू झाला. दरम्यान शालिकमार यांच्या घराशेजारी आरोपी अक्षय शाहू याचा मुलगा खेळत होता. मुलं गोंधळ करतात म्हणून शालिकराम यांनी अक्षयच्या मुलाला मारलं. त्या रागातून अक्षय आणि शालिकराम यांच्या कुटुंबात वाद झाला. त्याच वादातून अक्षयने शालिकराम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
जेव्हा अक्षयने शालिकराम यांच्यावर हल्ला केला तेव्हा शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा मध्ये पडले. त्यांच्यावर देखील अक्षयने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढळा. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अक्षय शाहू याचा मुलगा खेळत होता. त्याचवेळी शालिकराम यांनी त्याला मारलं. त्याच रागातून अक्षयने शालिकराम यांच्यावर हल्ला केला.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून देखील तपास सुरु करण्यात आला आहे. तर शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा किशोर सहारे याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेची माहिती घटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल, पोलीस निरीक्षक गोकुल सुर्यवंशी, एलसीबी पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान पोलीस पथकाने फरार अक्षयला खात रोडवरून ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा :
Bhandara Crime : भंडाऱ्यात मोक्काच्या आरोपीची गोळ्या झाडून हत्या, वाळूच्या व्यवसायातून वाद झाल्याचा अंदाज
[ad_2]