[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हैदराबाद : वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडला नमवल्यानंतर आज (6 ऑक्टोबर) पाकिस्तानची लढत नेदरलँडशी (Pakistan vs Netherlands) होत आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने झाले आहेत. पाकिस्तानने ते सर्व जिंकले आहेत. पाकिस्तानची बाजू उजवी असली नेदरलँड पारडे पलटवण्यात सक्षम आहे.
21 ऑगस्ट 2022 रोजी, नेदरलँड्सच्या पाकिस्तान दौर्यादरम्यान थरारक लढत झाली होती. विक्रमजीत सिंग आणि टॉम कूपर यांनी प्रत्येकी अर्धशतक झळकावून सामना अंतिम षटकापर्यंत नेला होता. अखेरीस, ते फक्त 9 धावांनी कमी पडले. नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांनी या सामन्यात अनुक्रमे 5 आणि 4 विकेट घेतल्या.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सीम बॉलर्सना उपयुक्त असेलच, पण फलंदाजांसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. या ठिकाणीही खेळपट्टीसाठी लाल माती, काळी माती आणि या दोन्हींचे मिश्रण वापरले जाते. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यापासून आपले लक्ष्य स्पष्ट करायचे आहे. जो त्यांच्यासाठी सर्वात सोपा ठरण्याची शक्यता आहे. श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील सामने होणार असल्याने पाकिस्तानला पहिले गुण मिळतील याची खात्री करावी लागेल.
[ad_2]