[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मुंबई महाविकास आघाडीच्या सरकारनंतर सरकारची दुर्दशा झाली आहे. नांदेडच्या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. ठाणे, नांदेड, संभाजीनगर, नागपूर येथे गेलेल्या जीवाला जबाबदार कोण? आणि कधी घेणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला आहे. या सरकारकडे गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नव्हते. त्यामुळे या सरकारची नि:पक्षपातीपणे सरकारची सीबीआय चौकशी मागणी उद्धव ठाकरेंन केली आहे.
एक फुल दोन हाफ कुठे?
रोज काही विषय समोर येत आहे. काही विषय जशेच्या तसे आहेत. दसरा मेळाव्यात मी विस्ताराने बोलणार आहे. परंतु सध्या मी अस्वस्थ आहे. कारण आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत हे बघून संताप येत आहे. कोरोनाचा संकट होतं तेव्हा मविआचा सरकार होते. आरोग्य यंत्रणा तीच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला. ड्रोनने सुद्धा औषध पुरवठा केला गेला होता. लसीकरण झालं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित झाला. योध्यासारखे हे सगळे लढले त्या आरोग्य यंत्रणेला बदनाम केलं जाताय याला जबाबदार कोण? आता एक फुल दोन हाफ कुठे ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राजज
[ad_2]