Asian Games 2023 India Medal Tally Will Reach On 100 As 7 Medal Secure By Various Sports

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 2023 : हँगझोऊत सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. भारताकडून मनप्रीत सिंगने 25व्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने 32व्या आणि 59व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 36व्या मिनिटाला आणि अभिषेकने 48व्या मिनिटाला गोल केले. जपानकडून तनाकाने 51व्या मिनिटाला संघासाठी एकमेव गोल केला. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला. दुसरीकडे, भारताकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाला कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या यामागुचीविरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात 10-0 असा पराभव पत्करावा लागला. भारताने आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकली आहेत. एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली आहे. अजून 7 पदके निश्चित असल्याने भारताची पदके (Asian Games 2023 India Medal Tally) शंभरावर जाणार आहेत. 

कुस्ती, तिरंदाजी आणि ब्रिजमध्येही पदके

कुस्तीमध्ये महिलांच्या 62 किलो वजनी गटानंतर भारताला 76 किलोग्रॅम फ्रीस्टाइलमध्येही कांस्यपदक मिळाले. भारताच्या किरणने मंगोलियाच्या गानबत अरियुंजरगलचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे, भारताच्या अमनने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोग्रॅम प्रकारात कांस्यपदक जिंकले. त्याचवेळी ब्रिज गेमच्या सांघिक अंतिम फेरीत भारताने रौप्यपदक पटकावले. आज भारतीय पुरुष संघाला तिरंदाजीच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी 21 वर्षीय सोनम मलिकने 62 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या जिया लाँगचा पराभव केला. यापूर्वी भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत थायलंडविरुद्ध पराभूत होऊन कांस्यपदक मिळवले होते. तिरंदाजी रिकर्व्ह महिला संघानंतर एचएस प्रणॉयने बॅडमिंटन पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले.

भारताची 100 पदके निश्चित

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 100 पदकांचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आज 9 पदके जिंकल्यानंतर भारताच्या पदकांची संख्या 95 झाली आहे. यासह आज भारताने 4 खेळांमध्ये आपली 7 पदके निश्चित केली आहेत. यानुसार भारत 100 पदके जिंकण्याच्या जवळ आहे.

या खेळांमध्ये भारताची पदके निश्चित

  • भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटमध्ये पदक येणे निश्चित आहे.
  • 2 पदके भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ कबड्डीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. तिथून दोन पदके निश्चित आहेत.
  • 3 पदक कंपाऊंड पुरुष वैयक्तिक अंतिम फेरीत, दोन्ही खेळाडू भारताचे आहेत, त्यामुळे सुवर्ण आणि रौप्य दोन्ही भारताकडे येतील. भारताची ज्योती सुरेखा कंपाउंड महिलांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत भाग घेणार आहे. येथेही भारताचे पदक निश्चित आहे.
  •  पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून भारताने आपले पदक निश्‍चित केले आहे. भारताची सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत मलेशियाच्या संघाशी भिडणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts