Asian Games 2023 Ojas Deotale Clinches Gold Abhishek Verma Gets Silver Archery Men’s Compound Individual Final Marathi News Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट कायम आहे. नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळे (Ojas Deotale) ने भारताला तिरंदाजीत आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये पुरुषांच्या एकल तिरंदाजी स्पर्धेत (Archery Men’s Compound Individual) भारतीय तिरंदाजांनी भारताला आणखी दोन पदकं मिळवून दिली आहेत. महत्वाचं म्हणजे पुरुष एकेरी तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्येच लढत होती. ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा या दोन्ही भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पार पडलेल्या अंतिम फेरीत ओजस देवतळेने सुवर्णभेद केला आहे.

ओजस देवतळेचं तिसरं सुवर्णपदक

महत्वाचं म्हणजे आशियाई स्पर्धा 2023 मध्ये ओजस देवतळेचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. मराठमोळ्या ओजसने तिरंदाजीत भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ओजस देवतळेने भारताला तिरंदाजीमध्ये पुरुष एकल, कपाऊंड आर्चरी आणि मिश्र तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताला मिळालेलं हे 26 वं सुवर्णपदक आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 101 पदकं जमा झाली आहेत. यामध्ये 26 सुवर्णपदक, 35 रौप्य पदकं आणि 40 कांस्यपदकांता समावेश आहे.

कपाऊंड आर्चरीमध्ये भारताचा सुवर्णभेद

तिरंदाज ओजस देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. तिरंदाज ओजस देवतळे, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी दक्षिण कोरियाचा पराभव करत भारताला गोल्ड मिळवून दिलं. भारताच्या टीमने 235-230 असा विजय मिळवला. अंतिम सामन्यात अभिषेक, ओजस आणि प्रथमेश यांनी शानदार प्रदर्शन केले.  

मिश्र तिरंदाजी भारताला सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड आर्चरी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं. ओजस देवतळे आणि ज्योतीच्या जोडीने तिरंदाजी मिश्र स्पर्धेत भारताला 16 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि वूई यिक सोह यांचा 21-17, 21-12 असा पराभव केला. यामुळे भारताला रौप्यपदक मिळालं आहे.

 



[ad_2]

Related posts