Unnatural Molested Against Women In Beed Gupta Dhan Was Opposed To Puja

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, गुप्तधनासाठी पुजा करण्यास विरोध केल्याने महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. गुप्तधन मिळवण्याच्या पुजेसाठी कुटुंबातील व्यक्तींनी पुजा करण्याचे ठरवले होते. या पुजेला बसण्यासाठी विरोध केल्यामुळे महिलेवर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केला आहे. ही घटना बीड शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह, सासू, सासरा व इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरातील एका भागात फिर्यादीच्या कुटुंबाने गुप्तधन मिळवण्यासाठी घरी पुजा करण्याचा घाट घातला होता. मात्र, या पुजेस बसण्यासाठी फिर्यादी महिलेने विरोध केला. तो विरोधा केल्यामुळे महिलेला जबरदस्ती करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. तसेच यासंदर्भात कोणाला काही सांगितले तर, मुलाला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, पीडितेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा, नंदावा व अन्य एका महिलेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रता व जादुटोना प्रतिबंधक कयाद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख केतन राठोड हे करत आहेत.

महिलेने केला पूजेला विरोधी…

बीड शहरातील एक कुटुंबांतील सदस्य अंधश्रद्धेचे प्रचंड आहारी गेले आहे. दरम्यान, या कुटुंबाने गुप्तधन मिळवण्यासाठी घरी पुजा आयोजित केली होती. यासाठी सर्व तयारी झाली आणि पूजा सुरु करतांना या पूजेला फिर्यादी महिलेला बसण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, सर्व विचत्र प्रकार दिसत असल्याने या महिलेने पूजेला बसण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

चारचाकीसाठी पाच लाखाची मागणी करत विवाहितेचा छळ

दुसऱ्या एका घटनेत, चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावत एका 24 वर्षीय विवाहितेस सतत मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ करून नांदविण्यास नकार दिला. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील कुंबेफळ हे माहेर असलेल्या महिलेचा विवाह 6 सप्टेंबर 2018 रोजी बोहाळी (ता. पंढरपुर जि. सोलापुर) येथील सागर लिंग्गाप्पा बोबडे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर एक वर्षाने चार चाकी गाडी घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत सासरच्या लोकांनी लावला. तसेच, सतत मारहाण करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला नांदविण्यास नेण्यास टाळाटाळ केल्याने तिने केज येथील महिला समुपदेशन केंद्रात प्रकरण दाखल केले असता सासरच्या लोकांनी तिला नांदविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed News : बाळाची साडे तीन लाखात विक्री, पाच आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी; पोलिसांकडून मास्टरमाइंडचा शोध सुरु

[ad_2]

Related posts