Maharashtra Education News HSC Exam Class XII Supplementary Exam Application Form Filling Start

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

HSC Exam: इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर क्रेडीट (Transfer of Credit) घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर क्रेडीट (Transfer of Credit)  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरू शकतात. शुक्रवार 9 जून 2023 पर्यत अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्क शनिवार 10 जून ते 2023 ते बुधवार 14 जून 2023 असा असणार आहे. तर उच्च माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत 1 जून 2023 ते गुरुवार 15 जून 2023 पर्यंत असणार आहे. तर उच्च माध्य.शाळ, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत 16 जून 2023 पर्यंत असणार आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी सूचना…

  • ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवाररी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
  • श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी.
  • सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
  • आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

HSC Exam Scam : बारावीच्या उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा अखेर शोध लागलाच; बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts