Khupte Tithe Gupte Raj Thackeray On Ajit Pawar And Parth Pawar Maval Election And Uddhav Thackeray Barsu Refinery

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: पक्ष म्हटल्यावर चढ-उतार हे येतातच, माझ्यावर टीका करणारे अजित पवार हे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. ते अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात बोलत होते. 

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध, बारसू रिफायनरी, मनसे पक्षाची वाटचाल, त्यांच्यावर होणारी टीका यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. मिमिक्री करण्यावरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे ते काही इतर आमदार निवडून आणू शकत नाहीत. मी माझा स्वतःचा पक्ष काढला होता, त्यामधून 13 आमदार निवडून आणले. पक्ष म्हटला की चढउतार हे येतातच. पण अजित पवार म्हणतात आता माझ्याकडे एकच आमदार आहे. अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, खूप छान दिवस होते ते, माहित नाही मला कुणी विष कालवलं ते, किंवा कुणी नजर लावली ती. 

गेल्या चार वर्षात शिवसेनेच्या दोन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या दोघांपैकी कोण शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं असं वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाल की, दोघांपैकी कुणीही शपथ घेताना बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याचं वाटलं नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं हे काही बाळासाहेबांचे स्वप्न नव्हतं. महाराष्ट्र बलशाली व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होतं असं राज ठाकरे म्हणाले. 

केरळमध्ये ‘केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी आणण्यात आली होती. चित्रपटावर बंदी आणणे यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला वाटतं की आपण लोकशाहीमध्ये राहतोय, पण ही वस्तुस्थिती नाही. झेंडा या चित्रपटामध्ये माझे कॅरेक्टर काहीसं निगेटिव्ह दाखवण्यात आलं होतं. पण मी त्याला विरोध केला नाही. पण आता चित्रपटांना विरोध केला जातोय. 

बारसू रिफायनरीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना बारसूचे पत्र हे उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, ते खालच्या माणसांवर ढकलून कसं चालेल? त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं का त्या ठिकाणी कातळ शिल्प सापडली? इतकी हजारो एकर जमीन एका दिवसात खरेदी केली नसणार. कोकणातील माणसाकडून कवडीमोल जमीन घ्यायची आणि ती हजारोपटींनी सरकारला विकायची हा धंदा सुरू केला काहीजणांनी. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कशी काय लक्षात आली नाही? 

ही बातमी वाचा :

 

[ad_2]

Related posts