World Cup 2023 Match 5 Ind Vs Aus Virat Kohli Made Third Most Runs Against Australia In One Day Internationals

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC World Cup 2023 : भारतीय संघ आज विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात चेन्नईच्या मैदानात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा सामना होणार आहे. दोन्ही संघाला विश्वचषकाचा दावेदार म्हटले जातेय, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या हायव्होल्टेज सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. 

विराट कोहली मागील काही दिवसांपासून लयीत परतला आहे. विश्वचषकाआधी विराट कोहलीचा फॉर्म चाहत्यांना दिलासा देणारा आहे. विराट कोहली नेहमीच बलाढ्य संघाविरोधात मोठी खेली करतो. विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा रतीब लावतो. आकडेही विराट कोहलीच्या कामगिरीची साक्ष देता. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही विराट कोहलीचं कौतुक केलेय. 

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरोधात रेकॉर्ड – 

विराट कोहलीने वनडे फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधात 45 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये   53.1 च्या शानदार सरासरीने 2,228 धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीने आठ शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक धावा श्रीलंकाविरोधात ठोकल्या आहेत. श्रीलंकाविरोधात कोहलीने 50 सामन्यात 62.7 च्या सरासरीने 2506 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजविरोधात कोहलीने 41 सामन्यात 66.55 च्या सरासरीने 2261 धावा चोपल्या आहेत. म्हणजेच, वनडेमध्ये सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाविरोगात तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत. विराट कोहली टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

विराटच्या खांद्यावर मोठी जबाबदारी –

भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिल आज खेळणार नाही. गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात गिल मुकणार आहे. त्यामुळे विराट कोहलीची जबाबदारी वाढलेली असेल. त्यामुळे विराट कोहली पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या साथीने भारताची धावंसख्या वाढवण्याचे काम विराट कोहली करेल.  विश्वचषकातील या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्येही चांगली कामगिरी केली आहे. आता या विश्वचषकाच्या सामन्यात विराट किती धावा करतो हे पाहावे लागेल.

[ad_2]

Related posts