World Cup 2023 Why Australia Team Jersey Always In Yellow And Green Colour

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023: विश्वचषक सुरू झाला आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आजचा दिवस भारतीय प्रेक्षकांसाठी खूप खास आहे, कारण आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामना आहे. पण इथे मुद्दा या सामन्याचा नाही, तर ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघाच्या जर्सीचा आहे. कोणत्याही देशाच्या संघाची जर्सी मैदानात पाहताच आपण ओळखतो की, हा या देशाचा संघ आहे.

जर्सी ही त्या त्या संघाची ओळख असते, ऑस्ट्रेलिया संघाची जर्सी पिवळी आणि हिरवी आहे. आता त्यांनी हा रंगच का निवडला? यामागेही एक कारण आहे.

ऑस्ट्रेलियाच्या जर्सीच्या मागे आहे कहाणी

ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमागील संपूर्ण कहाणी त्यांच्या राष्ट्रीय फुलाशी संबंधित आहे. वास्तविक, या देशाचे राष्ट्रीय फूल ‘द गोल्डन वॅटल’ आहे. गोल्डन वॅटलच्या फुलाची पानं हिरवी आणि त्या फुलाचा रंग पिवळा असतो. या आधारावर ऑस्ट्रेलियाच्या जर्सीचा रंग ठरवला गेला आहे. ही फुलं दिसायला खूप सुंदर आहेत आणि ती मूळ याच देशातील आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियाची जर्सी पूर्णपणे पिवळी आहे आणि त्याच्या काठावर हिरवा रंग आहे.

सन्मानासाठी जर्सीही बदलली

2020 मधील T20 मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने 152 वर्षांपूर्वीच्या आपल्या संघाचा आदर करण्यासाठी एक नवीन जर्सी परिधान केली होती. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने परिधान केलेली जर्सी ऑस्ट्रेलियन संघाने 1868 मध्ये परिधान केली होती. हा ड्रेस काकू फिओन क्लार्क आणि कोर्टनी हेगन यांनी डिझाईन केला होता. 1868 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन संघाने परदेश दौरा केला होता. यादरम्यान, संघ तीन महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर युनायटेड किंगडमला पोहोचला आणि तेथे त्यांनी जगप्रसिद्ध मैदानावर 47 सामने खेळले होते.

ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षाच्या फलंदाजाने मोडला एबीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षाच्या फलंदाजाने एबी डिव्हिलिअर्सचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे कप स्पर्धेत  केरन रॉल्टन ओव्हल मैदानात एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडीत निघाला आहे. रविवारी दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध टास्मानिया संघामध्ये लढत झाली. या सामन्यात 21 वर्षांच्या फलंदाज जेक फ्रेजर मॅकगर्क याने एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडला आहे. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक ठोकले. एबी डिव्हिलिअर्स याने 2015 मध्ये 31 चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम आज मोडीत निघाला आहे, पण हा सामना आंतरराष्ट्रीय नव्हता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडीत निघाला आहे.

हेही वाचा:

IND vs AUS World Cup 2023 LIVE Score :इशान किशन 0, रोहित 0, श्रेयस अय्यर 0, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन ओव्हरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’

[ad_2]

Related posts