[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंपामध्ये 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानातील भूकंपाबाबतची डच भूगर्भशास्त्रज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली आहे. अफगाणिस्तानमध्ये होण्याआधीच डच भूगर्भशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स (Frank Hoogerbeets) यांनी या भूकंपाचं भाकीत केलं होतं. हे भाकित खरं ठरलं आहे. हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियातील भूकंपाबाबतही भविष्यवाणी केली होती. तुर्की आणि सीरियामध्ये यावर्षांच्या सुरुवातीला शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामध्ये 50,000 हून अधिक जणांनी प्राण गमावले.
अफगाणिस्तानमधील भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली
डच भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी अफगाणिस्तानच्या भूकंपाबाबत भविष्यवाणी केली होती. हूगरबीटस् यांनी म्हटलं होतं की, येत्या काळात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या आशियाई देशांना तुर्कस्तानसारखा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल. अफगाणिस्तानमधील भूकंपाचं भाकित खरं ठरल्यानंतर आता भारतात भूकंप होण्याची शक्यता भीती व्यक्त केली जात आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या आशियाई देशांना तुर्कस्तानसारखा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल, असा अंदाज हूगरबीट्स यांनी वर्तवला होता
आता भारत आणि पाकिस्तानला विनाशकारी भूकंपाची भीती
फ्रँक हुगरबीट्स यांनी याआधी एका व्हिडीओमध्ये भारताला आणि पाकिस्तान भूकंपाचा धोका असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तुर्की आणि सीरियामधील भूकंपाचं भाकीत खरं ठरल्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. फ्रँक हुगरबीट्स एक डच शास्त्रज्ञ असून ते भूकंपाबाबतच भाकित करण्यासाठी गणिती साधनांचा वापर करतात.
डच शास्त्रज्ञाचं भारताबद्दचं भाकित
strong fluctuations – potential for strong to major seismic event pic.twitter.com/8OhAv363mp
— SSGEOS (@ssgeos) September 30, 2023
भारतीय भूगर्भशास्त्रज्ञानेही व्यक्त केला अंदाज
महत्वाचं म्हणजे भारतीय भूगर्भशास्त्रज्ञानेही भारतामध्ये मोठा भूकंप होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय भूगर्भशास्त्रज्ञाने म्हटलं की, भारतीय टेक्टोनिक प्लेट दरवर्षी 5 सेमी वेगाने सरकत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Hyderabad| Earth’s surface comprises various plates that are constantly in motion. The Indian plate is moving about 5 cm per year, leading to accumulation of stress along the Himalayas increasing the possibility of a greater earthquake: Dr N Purnachandra Rao, Chief Scientist,NGRI pic.twitter.com/YCwCInLcm8
— ANI (@ANI) February 21, 2023
भूकंपशास्त्रज्ञ आणि हैदराबादमधील जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (NGRI) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांच्या मते, भारतीय टेक्टोनिक प्लेट सरकत असल्याने हिमालयीन प्रदेशात भूकंपाचा धोका वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात भूकंपाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]