Indian Cricket Team S Failed Top Order May Increasing The Problem Odi World Cup 2023 Rohit Sharma Ishan Kishan And Shreyas Iyer

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team’s Top Order : भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषकाची सुरुवात धमाकेदार केली. पण पहिल्याच सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फेल गेली. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर या तिन्ही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अवघ्या दोन धावांत भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. फलंदाजाच्या बॅटमधून एकही धाव निघाली नव्हती. पहिल्या सामन्यात टॉप ऑर्डर फेल गेल्यामुळे टीम इंडियासमोरील चिंता वाढली आहे. प्रत्येक सामन्यात तुम्हाला विराट कोहली अथवा केएल राहुल सामना जिंकून देऊ शकणार नाहीत. त्यात आपली लो ऑर्डर फलंदाजी कमकुवत आहे. 

माफक 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची टॉप ऑर्डर फलंदाजी फेल गेली. दोन षटकात दोन धावांत तीन फलंदाज भारताने गमावले होते. या कठीण परिस्थितीतून विराट कोहली आणि राहुल यांनी भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावा जोडल्या. पण प्रत्येकवेळा हे दोन्ही फलंदाज सामना जिंकून देतील, यावर अलंबून राहून जमणार नाही. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील. भारताची लोअर ऑर्डर फलंदाजी अतिशय कमकुवत आहे. 

भारताच्या फलंदाजीत डेप्थ नाही – 

भारताच्या फलंदाजीमध्ये डेप्थ दिसत नाही. हार्दिक पांड्या याच्यानंतर तळाला तगडा फलंदाज नाही. रविंद्र जाडेजा, अश्विन/शार्दूल यांचा पर्याय आहे. त्यानंतर बुमराह, सिराज, कुलदीप ये फलंदाज असतील. पण हार्दिकनंतर इतर खेळाडू त्या दर्जाचे फलंदाजी करु शकणार नाहीत. रविंद्र जाडेजाही गेल्या काही दिवसांपासून फेल जातोय. त्याची भारतामधील आकडेवारी अतिशय खराब आहे. 

रविंद्र जाडेजाची भारतीय खेळपट्टीवर बॅट शांतच राहतेय. गेल्या काही वर्षांत त्याला मोठी खेळी करता आली नाही. मागील दहा वर्षांत रविंद्र जाडेजाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. मागील 10 वर्षात रविंद्र जाडेजा भारतामध्ये 26 डावात खेळला आहे. यामध्ये त्याला 25.4 च्या सरासरीने 406 धावा करता आल्या आहेत. 

आर. अश्विन कसोटीत दमदार खेळतो. पण वनडेमध्येही त्याला प्रभावी फलंदाजी करता आली नाही. 63 डावात त्याला 16.4 च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. त्याच्या खात्यावर फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. शार्दूल ठाकूर याच्याबाबतही तीच परिस्थिती आहे. शार्दूल फलंदाजी करु शकतो, पण भरवशाचा फलंदाज म्हणू शकत नाही. कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचे फलंदाजी स्किल शून्य आहे.  

[ad_2]

Related posts