ODI World Cup 2023 Shubman Gill Discharged From Chennai Hospital Dengue Treatment Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला (Shubman Gill Latest Health Update) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) तो टीम इंडियासाठी कोणता सामना खेळणार? याबाबत बीसीसीआयने याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीला तो मुकला होता. त्याच्या अनुपस्थित इशान किशनला सलामीला संधी मिळाली होती. 

तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही

शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुभमन गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. गिलच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले होते. त्याच्या आरोग्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले, तो कोणत्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही. अशा स्थितीत टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

6 ऑक्टोबर रोजीच शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. अशा स्थितीत 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात गिलच्या जागी ईशान किशनला सलामीसाठी मैदानात उतरवण्यात आले होते. यावेळी सलामीला आलेला ईशान 0 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धही इशानला संधी दिली जाऊ शकते.

शुभमन गिलने 35 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने आतापर्यंत 66.10 च्या सरासरीने आणि 102.84 च्या स्ट्राइक रेटने 1917 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6 शतके आणि 9 अर्धशतके आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या दृष्टीकोनातून एकदिवसीय सामना खूप महत्त्वाचा आहे. तर 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शुभमन गिलने 11 सामन्यांमध्ये 30.40 च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत. तर 18 कसोटी सामन्यांच्या 33 डावांमध्ये गिलने 32.20 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत.

भारतीय संघाचे वर्ल्डकप शेड्यूल

  • 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई (भारतीय संघ 6 गडी राखून विजयी)
  • 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
  • 14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
  • 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
  • 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
  • 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
  • 2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
  • 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
  • 12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळूर

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts