Crime News: विरार रेल्वे स्थानकातून 4 वर्षीय मुलाचं अपहरण; काही तासांच्या आत मुलाची सुटका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vasai News: विरार रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाची अवघ्या नऊ तासांत सुखरूप सुटका करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आलं आहे. लहान मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपीला वसई लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद उर्फ असिफ मन्सूर पठाण असं आरोपीचं नाव असून, हा मूळचा बिहारचा राहणारा आहे आणि हा पाच दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. लोहमार्ग पोलिसांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

रविवारी (28 मे) दुपारी एकच्या सुमारास एक रस्त्यावर राहणारी महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासह विरार रेल्वे स्थानाकात आली होती. तिचा अवतार पाहून आरोपीने महिलेसोबत ओळख केली आणि तिच्या मुलाला एक वडापाव देखील खाऊ घातला. त्यानंतर स्थानाकावरच महिलेला झोप लागली असता तिच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन आरोपी दुपारी 2 च्या सुमारास फरार झाला.

महिलेने मुलाला खुप शोधलं, पण तो सापडला नसल्याने तिने वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. वसई लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) काढले असता आरोपी मुलाला घेऊन मुंबईच्या दिशेने लोकलमधून गेल्याचं दिसलं. तात्काळ सीसीटीव्ही सर्व स्थानकातील क्राईम ब्रांचकडे पाठवले असता, छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये (CSMT) रात्री 11 वाजता आरोपी मुलासह मिळून आल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ आरोपीला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून अटक करत लहान मुलाला रात्रीच आईच्या ताब्यात दिलं. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मुलाला बिहारला घेऊन जाणार होता. बिहारमध्ये नेऊन आरोपी मुलाचं काय करणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून आरोपीवर अजून काही गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती देखील वसई लोहमार्ग पोलीस घेत आहेत.

पुणे रेल्वे स्थानकातही घडला होता असाच प्रकार

पुणे स्टेशनवर आई दारूच्या नशेत असताना एका व्यक्तीने 9 जानेवारीला सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. मुलाला गुलबर्गा येथे नेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी गुलबर्गा पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून मुलाची सुटका केली आहे. इक्बाल हसन शेख (वय 32, रा. पेडगाव, कोल्हापूर) असे अपहरणकर्त्याचे नाव असून तो सध्या कर्नाटकमधील गुलबर्गा रेल्वे स्टेशनजवळ राहतो. गुलबर्गा पोलिसांनी इक्बाल शेख याला अटक करून मुलाला ताब्यात घेतले.

[ad_2]

Related posts