ODI World Cup 2023 England Give Target 365 Runs Against Bangladesh Innings Highlights HPCA Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धर्मशाला : धर्मशालात सुरु असलेल्या (ENG Vs BAN, Innings Highlights) सामन्यात इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध (ODI World Cup 2023) 364/9 अशी मजल मारली. सलामीवीर डेव्हीड मलानने दमदार शतकी खेळी करताना 140 धावांचा पाऊस पाडला. ज्यो रूटने 82 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावा जोडल्या. तत्पूर्वी, बांगलादेशने इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मलान यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी सलामीच्या विकेटसाठी 115 धावा केल्या. शकीब अल हसनने बेअरस्टोला बाद केले.

बांगलादेशने अखेरच्या 10 षटकांत काउंटर केल्याने इंग्लंडला केवळ 68 धावा जोडता आल्या आणि सात विकेट गमावल्या. महेदी हसनने 8 षटकांत 71 धावा देत चार विकेट घेतल्या. शरीफुल इस्लामने लियाम लिव्हिंगस्टोनलाबाद केले, त्याने 75 धावा देत तीन बळी घेतले. दरम्यान, दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला. बांगलादेशने महमुदुल्लाहच्या जागी मेहदी हसनला मैदानात उतरवले. इंग्लंडने मोईन अलीच्या जागी रीस टोपलीला खेळवलं आहे.

सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नऊ विकेट्सने हार पत्करल्यानंतर, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची नजर अपसेटवर असेल आणि विजयी घोडदौड अबाधित ठेवण्यावर असेल. शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील संघाने मागील लढतीत अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशसाठी त्यांचा सर्वात मोठा स्टार कर्णधार शकिब आहे. शाकिब व्यतिरिक्त मेहदी हसन मिराजवर लक्ष असेल. या अष्टपैलू खेळाडूने अफगाणिस्तानविरुद्ध दोन्ही आघाडीवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि तो फॉर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. लिटन दास आधीच्या लढतीत लवकर बाद झाला होता, तर त्याला इंग्लिश आक्रमणाविरुद्ध बांगलादेशच्या फलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.

बांगलादेशची खराब सुरुवात 

दुसरीकडे, बांगलादेशची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. अवघ्या 10 षटकांत 4 बाद 65 अशी स्थिती झाली आहे. सलामीवीर लिट्टन दासने अर्धशतक करत एक बाजू लावून धरली आहे. मात्र, चार फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने बांगलादेश संकटात आहे. 

1-10 षटकात बांगलादेश 
> लिटन दासने ख्रिस वोक्सविरुद्ध तीन चौकार मारून हॅटट्रिकने सुरुवात केली
> टोपलीने पहिले षटक टाकले, दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या
>तन्झिद हसन आणि शांतो दोघेही शून्यावर बाद
> लिटनच्या एलबीडब्ल्यूला आव्हान देण्यासाठी इंग्लंडने रिव्ह्यू गमावला
> साकिबला टोपलेने बाद केले
> मेहदी हसन मिराझला वोक्सने बाद केले. 
> बांगलादेश 57/4 वर गडगडला, लिटनने 43 धावांवर खेळत आहे. 

 इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts