[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
धर्मशाला : डेविड मलानने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 140 धावा आणि रीस टोपलीने घेतलेल्या चार विकेटच्या जोरावर बांगलादेशचा 137 धावांनी धुव्वा उडवत इंग्लंडने (ICC Cricket World Cup 2023) पहिला विजय नोंदवला. इंग्लंडचा हा वर्ल्डकपच्या इतिहासातील चौथा मोठा विजय ठरला. टूर्नामेंटच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने नऊ विकेट्सने पराभूत केल्यामुळे इंग्लंडवर दबाव होता. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 बाद 364 धावांची मजल मारली. मलानने 140 धावांची खेळी करताना जॉनी बेअरस्टो (52) आणि जो रूट (82) यांच्यासोबत शतकाहून अधिक भागीदारी केली. स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळत असलेल्य वेगवान गोलंदाज टाॅपलीने (4-43) याने पहिल्या सहा षटकांमध्ये बांगलादेशच्या आघाडीची फळी तंबूत पाठवली आणि इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. बांगलादेशचा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 227 धावांत आटोपला.
तत्पूर्वी, इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध (ODI World Cup 2023) 364/9 अशी मजल मारली. सलामीवीर डेव्हीड मलानने दमदार शतकी खेळी करताना 140 धावांचा पाऊस पाडला. ज्यो रूटने 82 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावा जोडल्या. तत्पूर्वी, बांगलादेशने इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मलान यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी सलामीच्या विकेटसाठी 115 धावा केल्या. शकीब अल हसनने बेअरस्टोला बाद केले. बांगलादेशने अखेरच्या 10 षटकांत काउंटर केल्याने इंग्लंडला केवळ 68 धावा जोडता आल्या आणि सात विकेट गमावल्या. महेदी हसनने 8 षटकांत 71 धावा देत चार विकेट घेतल्या. शरीफुल इस्लामने लियाम लिव्हिंगस्टोनलाबाद केले, त्याने 75 धावा देत तीन बळी घेतले.
दुसरीकडे, धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. अवघ्या 10 षटकांत 4 बाद 65 अशी स्थिती झाली आहे. सलामीवीर लिट्टन दासने अर्धशतक करत एक बाजू लावून धरली . मात्र, चार फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने बांगलादेश संकटात सापडला. लिट्टन दासने दमदार लढत देताना 76 धावा केल्या. मधल्या फळीने जोरदार लढत दिली, पण सलामीची फळी अपयशी ठरल्याने प्रयत्न तोकडे पडले. मुश्कफीर रहीम (54), तौहीद हृदोय (39) यांनीही प्रतिकार केला, पण आव्हान मोठे असल्याने त्यांची लढत अपुरी पडली.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]