Ind Vs Afg World Cup Match Virat Kohli And Naveen Ul Haq Face Off After Ipl 2023 Spat Ahead India Vs Afghanistan ICC World Cup Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanishan, World Cup 2023 : आज एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. सामना टीम इंडिया (Team India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanishan) असला तरी, चर्चा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल-हक (Naveen-Ul-Haq) ची आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल-हक मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसतील. आयपीएलमधील विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. आयपीएलनंतर कोहली आणि नवीन उल-हक आमने-सामने येणार असल्याने आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोहली आणि नवीन उल-हकची टक्कर

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा कट्टर वैरी नवीन उल-हक यांची दोन वर्षानंतर एकदिवसीय किक्रेटमध्ये वापसी झाली आहे. अफगाणिस्तानचं कर्णधारपद हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आल्यानंतर नवीन-उल-हकचं वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानच्या संघात पुनरागमन झालं आहे. त्यामुळे आज या दोन्ही खेळाडूंमधील टशन पुन्हा एकदा दिसून येणार आहे. 

कोहली आणि नवीन उल-हक आमने-सामने

आयपीएल 2023 च्या हंगामात सर्वाधिक चर्चा झाली ती, कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील वादाची. 1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला. लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भरमैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वादही झाला होता. आता नवीनच्या पुनरागमनानं 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यानं पुन्हा एकदा उत्साहाला उधाण आलं आहे. 

अफगाणिस्तान वर्ल्ड कप 2023 स्क्वॉड

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब-उर-रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक. 

टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts