Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 11th October 2023 Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

Weather Update : गेला-गेला म्हणता पावसाची पुन्हा एन्ट्री! पुढील 24 तासांत ‘या’ राज्यात कोसळणार परतीचा पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट

देशभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागांत अद्याप मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, तर काही भागांत उन्हाच्या झळा बसत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालयसह सिक्कीमध्ये अतिवृष्टी झाली असून पुढील 24 तासांतही या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर…

“निवडणूक आयोगाचा निकाल तत्वांविरोधात”, ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे असा दावा करत निवडणूक आयोगात (Election Commission)  धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा  युक्तीवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर…

Afghanistan Earthquake : भूकंपातून सावरत असलेलं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं! 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तान (Afghanistan) पुन्हा एकदा हादरलं आहे. बुधवारी पहाटे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. 11 ऑक्टोबरला पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. अमेकिन भूगर्भ संशोधन संस्था USGS च्या माहितीनुसार, हैरात प्रांताच्या आसपासच्या परिसरात हा भूकंप झाला आहे. वाचा सविस्तर…

Israel-Hamas Conflict : इस्रायल-हमास संघर्ष सुरुच, 3000 जणांचा मृत्यू; अनेकांचे संसार उद्धवस्त

Israel-Hamas War : हमास आणि इस्रायली यांच्यात युद्ध सुरुच आहे. या युद्धात अनेक लोक जखमी झाले असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.  हमासेने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला आणि या दोन्हींमध्ये युद्धाला सुरुवात झाली. आज, बुधवारी या युद्धाचा पाचवा दिवस आहे. मंगळवारी रात्री समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या युद्धात 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिक तसेच सैनिकांचा समावेश आहे. वाचा सविस्तर…

11th October In History : संपूर्ण क्रांतीचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांचा जन्म, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन, बिग बी अमिताभ यांचा जन्म; आज इतिहासात…

इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते.  आजचा दिवसही त्याला अपवाद नाही. भारतातील संपूर्ण क्रांतीच्या घोषणेचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांची आज जयंती आहे. तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन आहे. मागील अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. वाचा सविस्तर…

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये आज कोहली आणि नवीन उल-हकची टक्कर; भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याकडे सर्वांच्या नजरा

India vs Afghanishan : आज एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. सामना टीम इंडिया (Team India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanishan) असला तरी, चर्चा विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन उल-हक (Naveen-Ul-Haq) ची आहे. आयपीएलमधील विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. आयपीएलनंतर कोहली आणि नवीन उल-हक आमने-सामने येणार असल्याने आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. वाचा सविस्तर…

Horoscope Today 11 October 2023 : मेष, कन्या, तूळसह ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 11 October 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर…

 

[ad_2]

Related posts